पुणे : रुग्णांची हेळसांड, बेडची कमतरता, व्हेंटिलेटर इत्यादी गोष्टींमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी जम्बो हॉस्पीटलच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत असा सज्जड दम दिला होता. आता नुकतीच याच जम्बो सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घडली आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
योगेश भद्रा आणि अजय बागलकोट अशी विनयभंग करणार्या दोन्ही डॉक्टरची नावे आहेत. गेल्या एका महिन्यापासून हे दोन्ही डॉक्टर त्या महिलेला उद्देशून अश्लील बोलत होते. काही दिवस त्या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर त्या दोघांनी तिला जास्त प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केली.
यामुळे अखेर त्या महिला डॉक्टरने दोघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरांची नेमणूक एका खासगी एजन्सीमार्फत करण्यात आली होती. दरम्यान अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही.