अल्पसंख्यांकांनी महाविकास आघाडीला मतदान केले तर व्होट जिहाद आणि पुण्यात एक विशिष्ट समाज भाजपला मतदान करतो तो कोणता जिहाद – शरदचंद्रजी पवार

बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मतदान केले तर व्होट जिहाद आणि पुण्यात एक विशिष्ट समाज भाजपला मतदान करतो मग तो कोणता जिहाद? आम्हाला त्याची सवय झाली आहे. कारण ते नेहमीच तसे मतदान करतात असे पत्रकारांशी बोलताना शरदचंद्रजी पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समुदायाने महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, असा आरोप महायुतीचे नेते करतात. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा आरोप केला जात आहे. आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडीओचा दाखल देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली. त्यामुळे महायुती याला धार्मिक रंग देऊन त्यांची विचारधारा दिसते.

व्होट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एकप्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही याच्या विरोधात आहोत, अशा शब्दात शरद पवार यांनी व्होट जिहादवरून फडणवीस यांना लक्ष्य केले. बटेंगे तो कटेंगे हा विषयदेखील धार्मिक मुद्द्यावरचा आहे. सत्ताधारी जेव्हा हे विषय पुढे करत आहेत. याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही, अशी खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळेच धार्मिक विषय काढून निवडणूक इतर विषयांवर नेण्याचा प्रयत्न होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!