दादा मित्र पक्षांकडून झालेल्या चुकांबाबत आपण कधी मुस्लीम समाजाची दिलगिरी व्यक्त केली का? – अजहर शेख

बारामती (वतन की लकीर ऑनलाईन): एका वर्षात मित्र पक्षांकडून मुस्लीम समाजाच्या सतत भावना दुखावल्या गेल्या. ही नाराजी दूर करण्यासाठी जाहीर सभेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने कधीही दिलगिरी व्यक्त केली नसल्याचे महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजहर युनूस शेख यांनी एका लेखी पत्राद्वारे थेट अजित पवार यांना कळविले आहे.

त्यांनी लेखी दिलेल्या पत्रात म्हटले की, दादा तुमच्या महायुती सरकार आणि तुमच्या काळात मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आपण सहानुभूतीच्या पलीकडे जावून मुस्लीम समाजाची मदत केली का? असेही म्हटले आहे. आज दादांबरेाबर पक्षात काम करणारे कित्येक मुस्लीम बांधव दादांबरोबर आहे असे सांगत आहेत मात्र, महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठानने व याचे संस्थापक अध्यक्ष अजहर शेख यांनी दादांबरोबर न जाण्याचा जो कळीचा मुद्दा आहे तो स्पष्टपणे मांडून दादांना बरं बोलण्यापेक्षा खरं बोलून आपली भावना पोहचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.

(1) रामगिरी महाराज याने केलेली जगाचे तारणहार हजरत मोहम्मद पैगंबर यांचेबाबत केलेले चुकीचे वक्तवे

(2) पुसेसावळी, गझापुर येथील दंगल

(3) शेकडो ठिकाणी गो-रक्षकांच्या नावाने मुस्लीमांवर झालेले हल्ले

(4) ट्रेनमध्ये मुस्लीम म्हणून एका एसआरएफ जवानाने धार्मिक घोषणा देत तीन मुस्लीमांना घातलेल्या गोळ्या

(5) महाराष्ट्रात 15 ते 20 ठिकाणी दर्ग्यावर झालेली जबरदस्ती अतिक्रमणे

(6) अहमदनगर सारख्या जिल्ह्यात उंबरे सारखे घडलेले प्रकरण

(7) मुस्लीम म्हणून होणारे आर्थिक, सामाजिक बहिष्कार

(8) मिरा भाईंदर, पुणे सारख्या ठिकाणी बुलडोझर सारखे तंत्र वापरले गेले.

(9) मोहसीन शेख ते नुरूल हसन या निष्पाप तरूणांना प्राण गमवावे लागले त्यांच्यासाठी आपण काय मदत केली.

(10) भाजपचे आमदार नितेश राणे मुस्लीमांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाषा करतो.

अशा अनेक घटना आहेत अशा घटना घडू नये म्हणून आपण उपमुख्यमंत्री या नात्याने या बेताल वक्तव्य व कृती करणार्‍या समाजकंटकावर कारवाई करण्याची गरज होती परंतु असे न होता आजही ही मंडळी बेभानपणे मुस्लीम विरोधात गरळ ओकत आहेत. या सर्व गोष्टींचा साकल्यबुद्धीने विचार केल्यास मुस्लीम समाज आपल्याबरोबर कसा राहील हा खरा कळीचा मुद्दा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!