दौंड: येथे हिंदू धर्मगुरू व हिंदूत्ववादी नेत्यांना आणून जगाचे तारणहार ह.मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द बोलून हिंदू-मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करणारे कोण? या वादातून स्वत:ची पोळी भाजणार्यांना मुस्लीम समाज निवडणूकीत थारा देणार नाही अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान यांनी भाजप व विद्यमान आमदार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना दिली.
सोहेल खान पुढे बोलताना म्हणाले की, मुस्लीम समाज काही प्रमाणात शिक्षीत तर मोठ्या प्रमाणात अशिक्षीत आहे. समाजाला दोन समाजात तेढ निर्माण करण्यास रस राहिलेला नाही ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कष्ट करून स्वत:ची व कुटुंबियांची उपजिवीका कशी भागेल याचा साकल्यबुद्धीने विचार करणारी आहेत. गेली 30 वर्षापासून दौंड नगरपालिका कुल यांच्या एकहाती ताब्यात आहे. दौंडमध्ये बीफ कत्तलखान्याची गरज नसताना कत्तलखाना उभारण्यात आला. यापेक्षा मुस्लीम समाजाला शैक्षणिक संस्था दिली असती तर समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नतीकडे वाटचाल झाली असती.
कत्तखान्याची मागणी नसताना नगरपालिकेत त्याचा ठराव झाला, सूचक अनुमोदक झाले. पूरनियंत्रण रेषा इ. झाले. कत्तलखान्याबाबत विविठ ठराव, ना हरकत प्रमाणपत्र लागतात हे कोणी दिले. याबाबत मागणी कोणी केली याची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. यास आमदाराची शिफारस मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांची परवानगी देतो आणि विशेष दुग्धविकास मंत्रालयातून ना हरकत प्रमाणपत्र कोणी शिफारस केल्यानंतर कोणाला मिळते हे कोणी ज्योतिष्याने सांगण्याची गरज नाही.
म्हणजे शहरात कत्तखान्याची गरज नसताना मुस्लीमांच्या माथी मारले जात आहे. सदर कत्तखाना होण्यामागचे खरे सूत्रधार दुसरेच आहेत. कत्तखाना झालेनंतर याठिकाणी जनावरे (अधिकृत/बेकायदेशीर) कापली जाणार, कत्तल झालेला माल निर्यात केला जाणार, कोट्यावधीची उलाढाला होणार यामुळे बीफ उद्योगाला चालना मिळणार हे सर्व कर्ताकर्वता पैसे कमविणारा कोण? हे ही जाणले पाहिजे.
एखादा गावात नव्याने बेकायदेशीर/कायदेशीर कत्तखाना सुरू झाल्यास, हिंदू बांधव त्यावर तुटून पडतात. तो बंद पाडण्यासाठी काहीही करतात मात्र, या कत्तखान्यासाठी हिंदू बांधव मुग गिळून गप्प का? हा खरा प्रश्र्न उपस्थित होत आहे. यामागे हिंदूंना फसवून मुस्लीमांना बदनाम करण्याचा डाव आहे का? असेही सोहेल खान यांनी सांगितले आहे.