इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहितेचा सतत भंग होत असल्याने संबंधित पक्षावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इंदापूर येथील काही तक्रारदारांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे मागणी केली आहे.
दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, 15 ऑक्टोबर 2024 पासून आचारसंहिता चालू झालेली आहे तरी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील या इंदापुरातील अनेक गावांमध्ये परवानगी न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची जनसंवाद यात्रा चालू केली आहे व गावोगावी मंदिरामध्ये स्पीकर वापरून सहभाग घेतात. त्याचप्रमाणे या जनसंवाद यात्रेसाठी चार चाकी गाड्या झेंडे लावून वापरल्या जात आहेत तरी सदर प्रकरणात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा संबंधितांवर नोंदवण्यात यावा.
सदरचा गुन्हा दाखल करण्याबाबत अखिल भारतीय सम्राट सेनेचे संस्थापक भीमराव अण्णा कडाळे पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष किरण सत्याप्पा गोफणे यांनी दाखल केली आहे.