बारामती: येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे, आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारे वस्ताद अस्लम शेख यांनी येणार्या युवकांचे उगवते नेतृत्व युगेंद्र श्रीनिवास पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून बारामती येथील हिंदू-मुस्लीमांचे प्रतिक असलेले ह.चॉंदशाहवली बाबा दर्गाहला फुलांची चादर अर्पण करण्यात आली.
युगेंद्र पवार यांना प्रथमत: पवार साहेबांनी विद्या प्रतिष्ठान सारख्या नावलौकीक असणार्या शैक्षणिक संस्थेत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याठिकाणी ते सक्षमपणे आपली भूमिका बजावित आहेत. सर्वात जास्त पवार साहेबांबरोबर सहवास असणारे युगेंद्र पवार आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर असते.
पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते सध्या काम करीत आहेत. संपूर्ण बारामती तालुका त्यांनी पिंजून काढलेला आहे. गाव,वाडी वस्त्यांमध्ये सध्या युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे. कित्येक ठिकाणी असणार्या अडचणी आजपर्यंत सुटल्या नाहीत त्या अडचणींचा युगेंद्र पवार यांनी आढावा घेतला आहे. उपस्थित प्रश्र्न कसे मार्गी लागतील याकडेही त्यांनी लक्ष केंद्रीत केलेले आहे.
बारामती विधानसभेचा आमदार कसा असावा तो युगेंद्रदादा पवार यांच्यासारखा असावा असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे. समोरच्या व्यक्तीचा प्रश्र्न ऐकून घेण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये आहे. प्रत्येक मतदार व नागरिकांची जान असणारा नेता म्हणजे युगेंद्र पवार आहे. युगेंद्र पवार हे कोणाचे न ऐकता स्वत: समस्या जाणून घेतात आणि त्यावर निर्णय घेतात. मात्र, बारामतीत असे कधी दिसत नव्हते. पुर्वेकडील पुढारी, पश्र्चिमेकडील पुढारी याने यायचे समोरच्या व्यक्तीबाबत कानात काहीतरी सांगायचे आणि तडकीफड समोरच्या व्यक्तीला बोलायचे त्याचा पानउतारा करायचा असे कृत्य केल्याने कित्येक नागरिक भिक नको पण कुत्रं आवर असे म्हणताना दिसत आहे.
पवार साहेबांनी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण केले व करीत आहेत. पवार साहेबांच्या उच्च विचारावर आज पवार कुटुंबियातील युवकांमध्ये आ.रोहित पवार व त्यानंतर युगेंद्र पवार अनुकरण करताना दिसत आहेत. बारामती तालुक्यातून युगेंद्र पवार यांना सीट मिळाली ते खूप जोमाने कामे करू शकतात. ठेकेदारांसाठी नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी ते पहाटे कामाला लागतील हे ही तेवढेच खरे आहे. युगेंद्र पवार यांचे वडिल श्रीनिवास पवार व आई शर्मिला पवार यांचा दांडगा जनसंपर्क पाठीशी आहे. त्यामुळे बारामती विधानसभेची युगेंद्र पवार बाजी मारल्याशिवाय राहणार नाही व आमच्यासारखे युवक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असेही अस्लम शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.