यावर्षीही पुण्यात दहिहंडी उत्साहात बारामतीच्या नावलौकीकात भर टाकणारे आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ

बारामती: यावर्षीही पुण्यात जावून दहिहंडी उत्साहात बारामतीच्या नावलौकीकात भर टाकणारे अण्णाभाऊ साठे तरूण मंडळ ठरले. माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

दरवर्षी पुणे याठिकाणी जावून मानाच्या हंड्या फोडण्याचे काम अण्णाभाऊ साठे तरूण मंडळ करीत आलेले आहे. आखिल खडकमाळ आळी येथील मानाची पहिली दहीहंडी उत्सव व राष्ट्रीय कला क्रीडा मंच व आर.सी.सी ग्रुप पुणे येथील दहिहंडी मंडळाच्या गोविंदा पथकाने थर लावीत फोडून पारितोषिक व मानचिन्ह मिळविले. बोल बजरंग बली की जय, ढाकु माक्कुम…ढाकु माक्कुम..च्या गजरात सर्व परिसत दुमदुमला व गोविंदा पथकासह गोपाळ भक्तांनीही एकच ठेका धरला.

दरवर्षी मंडळ जेजुरी, सासवड, पुणे या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी जात असतो. सदरील दहीहंडी उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ दहीहंडी संघातील सर्व गोविंदानी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!