बारामती: गेली 26 वर्ष परंपरेला उजाळा देत युनिटी फ्रेंडस् सोशल क्लब दहिहंडीचा उत्सव साजरा करीत आले आहे. यावर्षी फुलांनी विद्युत रोषणाईने सजवली हंडी गोपाळ भक्तांचे लक्ष वेधत होती. समस्त भोईराज दहिहंडी संघाने एकावर एक थर लावून हंडी फोडून 21 हजार रूपये पारितोषिक व चषकाचे मानकरी ठरले.
आकर्षक सजवलेली दहिहंडी, ती फोडण्यासाठी करडी नजर ठेवून बसलेला गोविंदा पथक व त्यावर बक्षिस आणि मच गया शोर सारी नगरी रे…. हे गाणं किती जुनं आहे मात्र, ते वाजल्यानंतर अंगात संचारल्याशिवाय राहत नाही अशा गाण्यांचा जलवा याठिकाणी पहायला मिळाला.
बारामतीमधील सर्वात जुनी व मानाची पहिली दहिहंडी म्हणून युनिटी फ्रेंडस् सोशल क्लबच्या दहिहंडी उत्सवाकडे पाहिले जाते. यंदाचे 27 वे वर्ष असल्याचे आयोजक क्लबचे अध्यक्ष व आधारस्तंभ माजी नगरसेवक निलेश(आप्पा) इंगुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सदरचा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्लबचे अक्षय इंगुले, चेतन इंगुले, सनी नागे, बाळा इंगुले, रवि करळे, दीपक शाहीर, अमीत पलंगे, अल्ताफ शेख, जमीर शेख, फारूख सय्यद, राजेश काळे, राजू कांबळे, सोनू बेंद्रे, रोहित गायकवाड, निखिल पलंगे, सागर खलाटे, सोहम वाडेकर, अजिंक्य सोनवणे, सुरज वारूळे, सोमा धनराळे, ऋषिकेश इंगवले, शुभम बिंद्रे, यश इंगुले यांनी मोलाचे सहकार्य केले.