बारामती: सिने तारे-तारकांच्या उपस्थितीत, अलोट गोपाळ भक्तांच्या गर्दीत एकलव्य चषक दहिहंडी उत्सवाची दहिहंडी मळद (ता.बारामती) येथील शिवाजी दहिहंडी संघाने फोडून पारितोषिक पटकाविले.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गांधी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित एकलव्य चषक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या दरम्यान आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर व मंडळाचे अध्यक्ष प्रविण धनराळे यांनी केले.

सिनेअभिनेते हार्दिक जोशी, मोनालिसा बागल आणि यशराज डिंबळे यांच्या प्रमुख उपस्थिती मुख्य आकर्षण ठरले. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, जय पवार आणि युगेंद्र पवार यांनी देखील शुभेच्छा भेट दिली.