इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): येथील कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानतर्फे 21 व 22 सप्टेंबर 2024 रोजी क्रीडा संकुल अंथुर्णे (ता.इंदापूर) याठिकाणी खुल्या गटात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून इंदापूर केसरीची घोषणा करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत गट-प्रथम-द्वितीय व तृतीय क्रमांक कंसात पुढीलप्रमाणे :- 57 कि.गट व 61 किलो या दोन्ही वजन गटात 1 हजार,7 हजार व 5 हजार असे पारितोषिक असुन, 65 किलो (12 हजार, 8 हजार व 6), 70 किलो (15 हजार, 10 हजार, 7 हजार), 74 किलो (17 हजार, 11 हजार, 8 हजार), 80 किलो (20 हजार, 15 हजार, 10 हजार) तर 80+ किलो वजन गटासाठी (51 हजार व इंदापूर ओपन केसरी गदा, 21 हजार व 11 हजार) असे पारितोषिके असणार आहेत. अशी माहिती नाना नरूटे, पै.श्रावण चोरमले, पै.युवराज नरूटे यांनी दिली.
सदरची स्पर्धा इंदापूर तालुक्यातील खेळाडूंसाठी मर्यादित आहे. खेळाडूंचे आधारकार्ड बंधनकारक राहील. खेळाडूंचे वजन 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत घेतले जाईल असेही आयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.