इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): जे कायमच आपल्या लाखो बहिणींचे संरक्षण करतात, नेहमी त्यांच्या संरक्षणासाठी दिवस रात्र एक करतात असे पोलीस बांधव यांना आज तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये राखी बांधून त्यांच्याकडून सदैव महिलांचे कायमस्वरूपी संरक्षण करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत हीच रक्षाबंधनाची भेट स्वीकारण्यात आली.
सदैव पोलीस महिलांचे रक्षण करीत आलेले आहेत. यापुढेही त्यांनी असे महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे हे वचन त्यांच्यांकडून रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त तेजपृथ्वी ग्रुपने भेट स्वरूपात घेतले असल्याचे तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अनिता खरात यांनी यावेळी बोलताना सांगितले.
इंदापूर तालुक्यात ही कायम सर्व धर्म समभाव शांतता लाभावी, हिंदू-मुस्लिम भाईचाराला कुठेही तडा जाऊ नये, कायमच आपण एकत्र राहावे असेच या रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वांना त्यांनी आवाहन केले.
या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बांधव, तेजपृथ्वी ग्रूपचे पदाधिकारी, कदम गुरुकुल विद्यालय चे विध्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.