इंदापुर (प्रतिनिधी-अशोक घोडके): राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंदापूर महाविद्यालयातील इयत्ता 11वी व 12वी कला आणि वाणिज्य विभागातील 190 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली तसेच आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी विद्यार्थिनींना जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःचे आरोग्य शालेय जीवनापासूनच व्यवस्थित कसे सांभाळायचे याची माहिती घेवून आरोग्य दक्षता घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.
उपप्राचार्य प्रा. दतात्रय गोळे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा कटाक्ष असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक व विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी विद्यार्थिनींना पौष्टिक आहाराचे आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना ( कनिष्ठ विभाग ) कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा जाधव यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य प्रा.धन्यकुमार माने,प्रा. हर्षवर्धन सरडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सूत्रसंचालन प्रा.राजीव शिरसट यांनी केले. आभार प्रा.कल्याणी देवकर यांनी मानले.
आरोग्य तपासणी शिबिरासाठी प्रा.सुनील सावंत, प्रा.अमोल मगर, प्रा.अमित दुबे, प्रा.रोहिदास भांगे, प्रा. रवींद्र साबळे व सहकारी शिक्षक यांचे सहकार्य लाभले.