जिजाऊ फेडरेशनच्या नोकरी महोत्सवात 341 युवकांना मिळाले नियुक्तीपत्र : हर्षवर्धन पाटील यांच्याकडून निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन

  • 1210 युवकांनी रोजगार संदर्भात केली होती ऑनलाईन नोंदणी

इंदापुर(प्रतिनिधी-अशोक घोडके) : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फेडरेशनने 16 ऑगस्ट रोजी घेतलेल्या नोकरी महोत्सवामध्ये 77 कंपन्यांनी 341 युवकांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देऊन त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे.

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या संकल्पनेतून इंदापुर तालुक्यातील हुशार,गरजू कौशल्याधिष्ठित युवकांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी इंदापूरमध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या नोकरी महोत्सवासाठी 1210 युवकांनी ऑनलाइन रजिस्टर नोंदणी केली होती. विविध क्षेत्रातील 77 कंपन्या या नोकरी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. 796 युवकांनी प्रत्यक्ष नोकरीसाठी मुलाखत दिली तर त्यापैकी 341 युवकांना कंपन्यांनी थेट नियुक्तीपत्र देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आज सकाळी 8 वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात मुलाखतीस सुरुवात झाली. यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील, अंकिता पाटील ठाकरे तसेच मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवसभर मोठ्या संख्येने युवकांनी या मेळाव्यास प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!