गुणवंत विद्यार्थी होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात – डॉ.वसंत बुगडे

जेएसपीएम येथे गुणवंत विद्यार्थी व मान्यवर गौरव सोहळा संपन्न

पुणे(प्रतिनिधी-तेहसिन शेख): गुणवंत विद्यार्थी होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात असे प्रतिपादन संकुल संचालक डॉ.वसंत बुगडे यांनी केले.

जे.एस.पी.एम.संचलित, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने एप्रिल-मे मध्ये घेण्यात आलेल्या बीएड्‌ परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व प्रा.शिवदास मुंडे यांचा निरोप समारंभाप्रसंगी डॉ.बुगडे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.खुशाल मुंढे होते. यावेळी संकुल संचालक डॉ.संजय सावंत, डॉ.भरत गोरडे, प्रा.दत्तात्रय साबळे, प्रा.दिपाली थोरात, प्रा.शिवदास मुंडे, प्रा.अजित चव्हाण, प्रा.निलोफर पटेल, प्रा.अर्चना राऊत, सुग्रीव जाधव इ. उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.बुगडे म्हणाले की, कष्टाशिवाय गुणवत्ता मिळू शकणार नाही. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी सत्काराची थाप दिल्याने आणखीन शिखर गाठण्यासाठी स्फूर्ती मिळते. या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल महाविद्यालयाचे व सर्व प्राध्यापकांचे आभार मानले.

याप्रसंगी डॉ.संजय सावंत, डॉ.भरत गोरडे, प्रा.दत्तात्रय साबळे, प्रा.दिपाली थोरात, प्रा.शिवदास मुंडे, प्रा.अजित चव्हाण, प्रा.निलोफर पटेल, प्रा.अर्चना राऊत, सुग्रीव जाधव यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.खुशाल मुंढे यांनी मार्गदर्शन केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बीएड्‌ द्वितीय वर्षात मोनी सक्सेना, पूजा यादव, कोमल शर्मा, वनिता वाले, मीनल कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेबद्दल त्यांचा गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रा.शिवदास मुंडे यांची बालाजी विद्यापीठ बालेवाडी पुणे येथे निवड झालेने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा कात्रे यांनी केले तर शेवटी आभार कोमल थोरात यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छात्र अध्यापक तेजस देवल, प्रतीक्षा माशाळ, नीता खामकर, सुकन्या हातागळे, सुनिता कामडी, शितल गोरे, सुजाता पाठक, रुचिता सिंग, मीनाक्षी मोटे, शितल सिताफळे, मनीषा खराडे, रोशनी फेगडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!