बारामतीः गेली कित्येक वर्षापासून आदिवासी समाजाच्या मागण्या, प्रष्न व अडचणी होत्या. आदिवासी समाजाच्या कब्ज्यात 4 हेक्टर असणा-या जमीनीच्या सात बारा सदरी कसणा-याचे नावे लावून सदरचे क्षेत्र कसण्यासारखे आहे असा शेरा मारावा असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले. यामुळे आदिवासी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे आदिवासी समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.
याबरोबर मुख्यमंत्री असेही म्हणाले की, जे दावे अपात्र केले आहेत ते मंजूर करावे. देवस्थान व गायरान जमिन कसणा-याच्या नावे करावी तसेच गायरान जागेवरील घरे आहेत ही घरे नियमित करावीत असेही त्यांनी विधानसभेत मांडले.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सर्व आदिवासी पारधी समाजाला कब्ज्यात असणा-या क्षेत्राची नोंद करावी. देवस्थान व गायरान जमिनी देणेबाबत ना हरकत ठराव करावा. वन जमीन, सरकारी जमीन, गायरान जमिनीचे संबंधित जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी विषे जातीने लक्ष घालून सर्व पारधी व आदिवासी समाजातील लोकांचे सर्वेक्षण करून कब्जेदार सदरील सातबारा उता-यावर नोंद करून सातबारे मिळावे.
नोंद लावताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता संबंधित अधिका-यांनी घ्यावी अशीही मागणी होत आहे. संबंधित वरिष्ठांनी नोंद घेणेबाबत संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांना योग्य तो आदेश द्यावेत. अशी विनंती महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी सेवक बयतीताई काळे यांनी केली आहे.
बयतीबाई काळे आमच्या प्रतिनिधीषी बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी वन हक्क जमिनी संदर्भात दावा दाखल असून त्याचे पुरावे व समिती स्थापन केलेली आहे तसे पुरावे देखील सादर केलेले आहेत. लऊळ ता.माढा येथील मंडल अधिकारी, तलाठी यांना सातबारा सदरी नोंद लावणेबाबत योग्य ते आदेष दयावेत. वन हक्क जमीन व सरकारी गायरान जमिनीबाबत शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नोंद करण्यात यावी अशी मागणी बयतीताई काळे यांची मागणी आहे.

सदरील नोंद लावताना ग्रामपंचायत ठराव किंवा कोणतीही समिती न स्थापन करता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वनहक्क व गायरान सरकारी जमिनीच्या कब्जेदार सदरी विनाअट सातबारावर नोंद घेण्याचे आदेष सुध्दा संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी दयावे अषीही विनंती बयतीताई काळे यांनी केली आहे.