बारामतीः येथील षिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे संत तुकाराम महाराज व संत बाळूमामा पालखी सोहळयात मोफत औषधे व डाॅक्टरांचा पुरवठा केलेबद्दल व पत्रकारांनी या उपक्रमास सहकार्य केलेबद्दल सत्कार करण्यात आला.
या उपक्रमास मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेशजी चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुख्य कक्ष प्रमुख राम हरी राऊत, माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक गुलाबराव बाजीराव गावडे पाटील, शिवसेना पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष पप्पू माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मेडिकल काॅलेजचे डीन श्री.मस्के, बारामती सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.महेश जगताप, महिला हाॅस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. भोई यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामती ते पंढरपूर पर्यंत पायी चालणा-या वारक-यांना पुरेल इतका औषध साठा व डाॅक्टर स्टाफ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच बारामतीतील सर्व पत्रकारांनी सुद्धा अनमोल असे सहकार्य केल्यामुळे यांचाही संपर्क कार्यालय बारामती येथे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार अविनाष रणसिंग, तानाजी पाथरकर, तैनूर शेख उपस्थित होते.
यावेळी संपर्क कार्यालयाचे प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे, पत्रकार निलेश गजरमल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बारामती तालुका अध्यक्ष हनुमंतराव देवकाते पाटील, डाॅ.अनिल जडे, सामाजिक कार्यकत्र्या सौ.कल्पना काटकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती महिला आघाडीच्या सौ.सुनिता डोंबाळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हाप्रमुख सौ.विद्या राजे गायकवाड, सौ.पुष्पांजली जडे, श्रेयश भोसले, बाबू केदार, संदीप पोमणे, सारिका पाटील, गणेश निंबाळकर, राजू नागरगोजे, सौ.निर्मला तावरे व बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.