सोलापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात आदिवासी समाजाला सरकारी जमीन गायरान व वन जमीनीत 4 हेक्टर अतिक्रम असल्यास सदरील जमीनीच्या 7/12 सदरी संबंधित अतिक्रम केलेल्या लोकांची नावाची नोंद करावी हा दिलेला शब्द पाळावा असे प्रतिपादन आदिवासी सेविका बयतीबाई शेकू काळे यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर आयोजित कार्यक्रमात बयती काळे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे ए.आ.वि.प्र.प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे होते. सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली काळे, पो.नि.अनिल सन्नगले, होटगीच्या सरपंच सौ.लक्ष्मीबाई गायकवाड, लऊळचे समाजसेविका पार्वतीबाई काळे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बयती काळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.20 जुलै 2024 रोजी विधिमंडळात बोलताना सांगितले की 7/12 नोंदी बरोबर वन हक्क दावे जे प्रलंबित आहेत ते सर्व दावे मंजूर करण्यात यावे. याबाबत इले.मिडीया व सोशल मिडीयावर याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे निर्णय झाल्यास आमच्या कुटुंबाला न्याय मिळेल. आमचे कुटुंबाचे अतिक्रमण गेल्या कित्येक वर्षापासुन आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंतिध वरिष्ठ अधिकारी यांना योग्य ते आदेश द्यावेत.
तसेच आदिवासी पारधी समाजासाठी दफन, प्रेत व स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून द्यावे. समाज मंदिर, पाणी, लाईट, रस्ता व कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शेत जमीनी मिळाव्यात, वहिवाटी करण्यात दिल्यास, धान्याची भिक्षा मागण्याचे बंद होईल व चांगले जीवन जगण्यासाठी मदत होईल. मुलांना शिक्षण घेणे सोयीचे होईल व जातीभेद होणार नाही. समाजाला माणुस म्हणून जगण्याची संधी मिळेल. ग्रामस्थांनी पारधी समाजाला मदत करावी व समाजाला समान जीवन जगण्यासाठी सहकार्य करावे. याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे याबाबत शासन दरबारी योग्य तो निर्णय घ्यावा असेही बयती काळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
याप्रसंगी रोहित काळे या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर स.प्र.अ.ए.आ.वि.प्र. व्ही. वाय सरतापे, होटगीचे मुख्याध्यापक डी.व्ही. रोकडे, ए.आ.वि.प्र. सोलापूरचे अधिक्षक एस.आर.भांगटे इ. केले होते.