बारामती: येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सायबर जागृतीचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृतीचे काम करण्यासाठी महाविद्यालयातील बी.बी.ए(सी.ए.), बी.एस.सी.(संगणक शास्त्र), बीसीए (सायन्स) विभागातील 20 विद्यार्थ्यांची सायबर वॉरइर म्हणून निवड करण्यात आली.
निवड झालेले विद्यार्थी हे प्रेझेंटेशन, माहिती पुस्तिका डाउनलोड, प्रश्नमंजुषा इ. उपक्रमाद्वारे शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन सायबर जागृती करणार आहेत.
प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यायाचे उप प्राचार्य डॉ.शामराव घाडगे यांनी विद्यार्थ्यांना अश्या उपक्रमामध्ये भाग घेऊन आपला सर्वागीण विकास करावा असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात बी.बी.ए (सी.ए.) विभाग प्रमुख महेश पवार यांनी सादर उपक्रमाची प्राश्वभूमी सांगून यावर्षी सायबर जागृकतेसाठी होणार्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
या उपक्रमासाठी शिक्षक समन्वयक सलमा शेख यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाचे सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. उपक्रमादरम्यान घेण्यात येणार्या विविध आवश्यकता, नियमावली इ. बाबीबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, बी.बी.ए (सी.ए.) विभाग प्रमुख महेश पवार, प्रा. गजानन जोशी, प्रा.किशोर ढाणे, गौतम कुदळे, डॉ.जगदीश सांगवीकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, कांचन खिरे व अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी, शिवानी चेडे हिने केले तर आभार सागर मेरावि यांनी मानले.