आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला आले यश, सुर्वे समिती अहवाल शासनाने स्वीकारला : शेती सिंचनाला खडकवासल्यातून मिळणार ज्यादा पाणी

विधिमंडळाच्या अधिवेशनात जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार दत्तात्रय भरणे यांना उत्तर , शेतकर्‍यांमध्ये समाधान

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या शेती सिंचनाच्या हक्काच्या पाण्यावरून तसेच सणसर जोड कालव्याच्या पाण्यावरून आमदार दत्तात्रय भरणे आक्रमक झाले. यासंदर्भात 3 जुलै रोजी विधिमंडळात थेट जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले व इंदापूरच्या शेतकर्‍यांना हक्काचे पाणी द्या. अशी आग्रही मागणी श्री भरणे यांनी विधिमंडळात अधिवेशनादरम्यान केली.

विधिमंडळात लक्षवेधी प्रश्न मांडत आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा सध्या जास्त पाणी पिण्यासाठी दिले जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम या प्रकल्पातून शेती सिंचनासाठी काढण्यात आलेल्या उजवा खडकवासला कालव्याद्वारे सिंचित होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनावरती होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी शासन स्तरावरून ज्या उपाय योजना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या संदर्भात मुद्दे उपस्थित करत आमदार दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारले.

यात प्रामुख्याने टाटा धरणाचे पाणी वळवून ते कधी इंदापूरच्या शेती सिंचनाला देण्यात येणार आहे. याचा खुलासा करावा. तसेच या संदर्भात नेमलेल्या सुर्वे समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या किंवा नाही या संदर्भात प्रश्न विचारले.

यावर जलसंपदा मंत्री श्री फडणवीस यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची शेतकर्‍यांविषयीची असलेली आत्मीयता लक्षात घेऊन यावर तात्काळ उत्तर दिले.

यानुसार सुर्वे समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून या सुर्वे समितीने सुचवल्याप्रमाणे तसेच इतर अनेकही या संदर्भात असलेल्या उपाययोजना लवकरच करण्यात येतील. इंदापूरच्या शेती सिंचनाला आगामी काळात जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना उत्तरा दरम्यान दिली. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!