इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): गोतंडी विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी अंबादास केशव नलवडे व कृष्णा सखाराम बनकर यांची उपविधी क्र.3(1) नुसार तज्ञ संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन अलका अर्जुन सावंत, अर्जुन भगवान शिंदे, सदस्य जयश्री दिनकर नलवडे, भाग्यश्री अंकुश नलवडे, युवराज सर्जेराव कांबळे, तुकाराम लक्ष्मण भोसले, हनुमंत भगवान मारकड, अंकुश निवृत्ती माने, संभाजी पांडुरंग बरळ, नवनाथ सावळा नलवडे, दिलीप निवृत्ती नलवडे, संभाजी शिवाजी लोकरे, मच्छिंद्र जयवंत आदलिंग उपस्थित होते.
दिवसेंदिवस सहकारी संस्थेतील सभासद संख्या वाढत असल्याने व संस्थेला अनेक उपक्रम करावे लागत असल्याने कार्यकारिणी सदस्यांचा भार हलका करण्यासाठी व अनुभवी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळवण्यासाठी सदरची तरतूद केलेली आहे. या तज्ञ संचालकांचा सोसायटीला उपयोग व लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी निवडणुकीचे कामकाज सोसायटीचे सचिव मारुती नलवडे यांनी पाहिले.
यावेळी दिनकर नलवडे, कैलास पाटील, अशोक कदम, अर्जुन सावंत, पोलीस पाटील हरिभाऊ खाडे-पाटिल, हौशी राव यादव शिवाजी तनपुरे, हरी यादव क्लार्क अक्षय भोसले उपस्थित होते.