मौ.आ.आ.वि.महामंडळाकडून उन्नती कर्ज योजनेचे 3 कोटी रक्कम जमा : ना.अजित पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन तसेच आलताफ सय्यद यांच्या प्रयत्नांना यश!

बारामती(प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांच्या प्रयत्नाने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबई तर्फे राबविण्यात आलेल्या उन्नती कर्ज योजनेत बारामतीतील 100 छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी 3 लाख प्रमाणे 3 कोटी रूपये कर्ज स्वरूपात जमा झाले.

14 मार्च 2024 रोजी बारामतीत कर्ज मंजूरी पत्र वाटपाचा भव्य-दिव्य कार्यक्रम घेण्यात आला होता. कर्ज मंजूर होऊ नये म्हणून काहींनी देव सुद्धा पाण्यात ठेवले होते. काहींनी तर दोन्ही हाताची बोटं मोडली होती. तर काहींनी सोशल मिडीयावर कार्य सिद्धीस नेणार्‍यांबाबत उलट-सूलट चर्चा सुद्धा केली. या सर्व प्रकाराने काहीच फरक पडेना म्हणून ना.अजित पवार यांचे कान भरण्यात आले. एवढं सर्व करूनही शेवटी हातावरचे पोट असणार्‍या या छोट्या व्यावसायिकांच्या खात्यात प्रत्येकी 3 लाख रूपये जमा झाले आणि या कर्जदारांचा जीव भांड्यात पडला. म्हणतात ना, निंदणाचं घर असावे शेजारी याप्रमाणे असे काहीसं घडलं.

ना.अजित पवार हे दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना गणले जाते. याचाच प्रत्यय 100 छोट्या व्यावसायिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा विचार करीत प्रत्येकी 3 लाख रूपये मंजूर केल्याने, या हातावरचे पोट असणार्‍यांचे अश्रु अनावर झाले. समाजात अशी काही लोकं आहेत तुमच्या बरोबर फिरतील, तुमचं खातील मात्र, तुमचं आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कल्याण होत असेल तर तुमच्यापासून दूर होऊन निंदा करतील, नावे ठेवतील.

बारामतीत मुस्लीम समाजात कित्येक नेते, पुढारी आहेत. मात्र, तळागळात काम करून आर्थिक मदत करणारा किंवा त्यांचे हित जपणारा नेता व पुढारी नाही पण आलताफ सय्यद यांच्या स्वरूपात असा नेता व पुढारी मिळाल्याने बारामतीतील तब्बल 200 लोकांना महामंडळातर्फे कर्ज स्वरूपात रक्कम मिळाली. याच महामंडळातर्फे कित्येक गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावून शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यामध्ये आलताफ सय्यद यांचा हात कोणीही धरू शकत नाही.

एखाद्याने रस्त्याने जाताना कोणी तुमची मदत केल्यास तुम्ही त्या अनोळखी व्यक्तीचे मनापासून आभार मानता, पुन्हा तो भेटल्यावर त्यास स्वत:च्या पैश्याने चहा, पाणी करता. आज आलताफ सय्यद यांनी कर्जस्वरूपात मिळवून दिलेल्या रक्कमेबाबत समाजातील मंडळींनी आभार मानले, त्यांचा सत्कार केला किंवा प्रेमापोटी जेवन दिले तर नावे ठेवणारे, निंदानालस्ती करणार्‍यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा प्रश्र्न समाजातील लोकांना पडलेला आहे.

आज बँक, संस्थांचे कर्ज घ्यायचे झाल्यास, ते कर्ज घेईपर्यंत येणारा खर्च करावाच लागतो. मग त्यामध्ये स्टॅम्प, नोंदी, झेरॉक्स, उतारे इ. खर्च समाविष्ट असतो. हा खर्च जर स्वत:हून कर्जदारांनी आलताफ सय्यद यांना दिला तर कोणते आभाळ फाटले. समाजात कित्येक नेते व पुढार्‍यांनी विविध पक्षाची, सामाजिक पदे भूषविली. समाजाचा विचार कोणी केला नाही जरी केला तर त्यात स्वार्थ पाहिला आहे. आलताफ सय्यद यांनी तळागळातील लोकांची मजबुत फळी निर्माण करून त्यांना आर्थिक हात देण्याचे काम केले तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय? जर तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही असे आणखीन 200 लोकांना याच महामंडळातर्फे कर्ज मंजूर करून लोककल्याण करा. मग हीच लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही.

आलताफ सय्यद या क्षेत्रात आज काम करीत नसून, गेली 20 वर्षापासून यामध्ये अखंडीत, सक्रीयपणे काम करीत आहेत व काम करीत राहतील यात शंका नाही. गेल्या वीस वर्षात नाव ठेवणारांची परिस्थिती काय आहे आणि आलताफ सय्यद यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती काय आहे याचे चिंतन करावे. येणार्‍या पुढील काळात तुम्ही सुद्धा या नभात गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!