मुर्ती लहान पण किर्ती महान असे हरहुन्नरी रोहित बनकर

साधी राहणी, नम्र आणि मवाळ भाषा पण कणखर बाणा आणि सर्वसामान्य माणसाशी जोडलेली नाळ असलेले, हरहुन्नरी बारामतीतील कॉंग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांचा आज वाढदिवस… प्रथमत: त्यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! यापुढील आयुष्य सुख,समृद्धी व भरभराटीचे व आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा!

रोहित बनकर यांची मूर्ती जरी लहान असली तरी किर्ती मात्र खूप महान आहे. इतरांप्रती आदर, सन्मान बाळगणारे असे त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल बोलता येईल. सहकार्य करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्याच्या कलियुगात आज कोणाला कोणाचे काही एक देणं-घेणं नाही, कोण कोणाच्या मदतीला धावून येत नाही. मात्र रोहित बनकर यास अपवाद आहे. सुख-दु:खाची वार्ता कळताच अध्या रात्री मदतीला धावणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

बारामतीत एखादा प्रश्र्न निर्माण झाल्यास त्याठिकाणी संबंधित अन्याय ग्रस्ताला धीर देण्यासाठी त्याच्या पाठीवर थाप देण्यासाठी रोहित बनकर आघाडीने पुढे असतात. वृक्षारोपण असो, रक्तदान शिबीर असो किंवा एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आग्रहास्तव त्याठिकाणी उपस्थित असतात.

बारामतीत कॉंग्रेस पक्षात जी मरगळ आली होती त्यास ऊर्जावस्थेत आणण्याचे काम काही प्रमाणात का होईना रोहित बनकर यांनी केले आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. कॉंग्रेसचा युवा चेहरा म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे. संयम आणि ऊर्जा असणारा युवा नेता अशी त्यांची ओळख निर्माण होत आहे. पक्ष संघटनेतील तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारा नेता म्हणून गणले जात आहे. बारामतीच्या आसपास दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा, खडकवासला, पुरंदर इ. ठिकाणी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्र्न प्रदेश कार्यकारणीवर मांडून मार्गी लावण्याची त्यांची धडपड असते.

रोहित बनकर यांना कोणताही राजकीय वारसा नसताना ते सक्रीयपणे कॉंग्रेस पक्षात काम करीत आहेत व आपली भूमिका मांडीत आहेत. महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली ते सध्या काम करीत आहेत. उमदे, आश्वासक आणि संघटनात्मक व्हिजन असलेले नेतृत्व कॉंग्रेसला उमलले आहे. आई वडिलांचा आशीर्वाद, तळागाळातील जनतेचे प्रेम, मोठा मित्र परिवार, नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवलेले राजकारणाचे धडे, त्यातून आलेली काम करण्याची ऊर्जा, तळमळ असणारा युवा नेता म्हणजे रोहित बनकर होय. अल्पावधीत राजकारणातील दुवे जाणून मार्गक्रम करणे म्हणजे सोपे नाही.

बारामतीत कित्येक नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले ते त्या कालावधी पुरते मर्यादित राहिले. त्यानंतर ते कधीच पक्षाच्या किंवा सामाजिक कार्यात सक्रीय झालेले दिसले नाही किंवा एखाद्याला मदतीचा हात दिला असे झाले नाही. मात्र, रोहित बनकर हे सतत प्रत्येकाच्या मदतीला धावणारा व कॉंग्रेस पक्षाचे विचार घेत झपाटलेला युवा नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण झालेली आहे. रोहित बनकर यांनी पक्षात काम सुरू केल्यापासून असंख्य विषय हाताळले असल्याने जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सेवेशी तत्पर अशा उक्तीप्रमाणे जनसेवक युवा नेते म्हणून त्यांच्याकडे विश्र्वासाने पाहिले जात आहे.

तरुण नेतृत्व, भिडण्याची धमक, जन्मजात बोलण्यात गोडवा, उत्कृष्ट संयोजक, उत्तम वक्तृत्व कौशल्य, अजातशत्रू या गुणांमुळे रोहित बनकर यांचा चेहरा समोर आला आहे. अशा युवा नेत्यास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा! येणार्‍या काळात त्यांच्या राजकीय, सामाजिक इच्छा पूर्ण व्हावेत हीच सदिच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!