शालेय पोषण आहार अपहारात मुख्याध्यापक : संस्था चालकांचा कानाडोळा, अपहाराची पाळेमुळे शोधून काढून कायदेशीर कठोर कार्यवाही करावी – आप्पासाहेब जगदाळे

इंदापूर (प्रतिनिधी अशोक घोडके): येथील श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनइर कॉलेजमध्ये शालेय पोषण आहार झालेल्या अपहार शाळेचेच मुख्याध्यापक, मात्र संस्थाचालक कानाडोळा व बघ्याची भूमिका घेत असतील तर या अपहाराची पाळेमुळे शोधून काढून कायदेशीर कठोर कार्यवाही करावी असे गटविकास अधिकारी इंदापूर यांना कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे आणि माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.

या अपहारामध्ये मुख्याध्यापक आणि इतरांनी अपहार केल्याचे चौकशी अहवालावरून सिध्द झालेले असताना संबंधितांना सदरची रक्कम शासन दरबारी जमा करण्याचे आदेश (शिक्षण अधिकारी (प्राथमिक), पुणे जिल्हा परिषद, पुणे यांनी मुख्याध्यापक, श्री. ना.रा. हायस्कूल व ज्यु. कॉलेज, इंदापूर यांना शापोआ योजना वसुली बाबतचे पत्र जा.क्र.जिप/शिक्षण/प्राथ/ पीएमपोषण /264/2024 दि.31/05/2024 प्रमाणे) असताना अद्यापही सदरील रक्कम जमा करण्यात आली नाही ही खूप खेदाची बाब आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1938 सालापासून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर यांचे मार्फत हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पवित्र कार्य करीत असतानाच हल्ली अशा घटना घडणे ही शोकांतीका आहे. सदर शालेय पोषण आहार योजनेमध्ये अपहार होणे हेच मुळात तालुक्यातील या संस्थेमध्ये शिकणार्‍या गोर गरीब विद्यर्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे.

शासन विविध योजनांद्वारे शिक्षण तळागाळात पोहचवण्याचे काम करत असतानाच श्री. सोरटे यासारखे मुख्याध्यापक आणि त्यांचे भ्रष्ट सहकरी त्यामध्ये पदाचा गैरवापर करत अडथळा आणताना दिसत आहे. सदर श्री.सोरटे यांच्याबद्दल बर्‍याच पालकांची तक्रार असल्याचे समजते. नुकत्याच चालू असलेल्या शालेय प्रवेशासंदर्भात पालक व विद्यार्थ्यांशी अत्यंत मुजोरीने बोलणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात आगाऊची प्रवेश शुल्काची मागणी करणे, बंगल्यावर जाऊन भेटा म्हणजे त्यांनी सांगितलेला प्रवेश होईल या सारख्या बर्‍याच तक्रारी पालक बोलून दाखवत आहेत.

ही संस्था खाजगी असल्यासारखा कारभार सद्या चालू आहे. संस्थेमध्ये एवढा अनागोंदी कारभार साधा मुख्याध्यापक करत असताना संस्थाचालक म्हणून अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ हे जाणिवपूर्वक याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.

तरी सदरील प्रकरण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे म्हणून याची गंभीर दखल घेऊन संबंधीतावर कडक कार्यवाही व्हावी. सदर निःष्पक्ष चौकशी होईपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी इंदापूर यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!