पुणे (प्रतिनिधी. प्रज्ञा आबनावे): आधारकार्ड शिबिर राबवीत शासन नियुक्त नगरसेवक विकी माने यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी युवासेना शहराध्यक्ष निकिता भंडारे, हडपसर अध्यक्ष निशा थोरात, सारीका पवार, प्रज्ञा आबनावे, शीतल गाडे, आशा यादव, प्रतिभा बोबडे, चंचलताई, ज्योती गागडे, आशा कांबळे, प्रीती कार्लेकर, अर्चना सूर्यवंशी, संगीता लोंढे, कांता हाके, मेटकरताई, मोहितेताई तसेच पांडुरंग कॉलनीतील सर्व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

या शिबिरात नविन आधारकार्ड काढणे, दुरूस्ती करणे तर काहींनी दहा वर्षापूर्वी काढलेल्या आधारकार्डातील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, भाषा अद्यावत करून घेतले.
येत्या 27 तारखेला वृक्षारोपण व आरोग्य शिबिर आणि विविध सरकारी योजना राबविण्यात येणार आहे.
या शिबिरास कालिदास आप्पा गायकवाड, सागर नार, जयराम रजपूत, अशोक गजरे, दीपक माने, पंडित वानखेडे, प्रवीण वाघमारे यांचे विशेष सहकार्य मिळाले-
या सर्व शिबीराचे आयोजन महिला अध्यक्ष राजश्री माने यांनी आयोजन केले-