बारामती(वार्ताहर): दि. 23 सप्टेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 28 तर ग्रामीण भागातून 41 रुग्ण आणि दि.22 सप्टेंबर मधील प्रतिक्षेत असलेले 05 जणांचा अहवालापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे, असे मिळून 69 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आली आहे.
काल 205 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 44 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 प्रतिक्षेत आहे. इतर तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. 97 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 24 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 69 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 2 हजार 856 रुग्ण असून, बरे झालेले 1 हजार 934 आहे तर मृत्यू झालेले एकोणसत्तर आहेत. काल काटेवाडी व निरावागज येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घेण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्वेक्षण मध्ये एकूण 199 लोकांची एंटीजेन तपासणी केली असता त्यामध्ये काटेवाडी मध्ये 22 व निरावागज येथे एक असे एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या 2879 झालेली आहे