बारामती(वार्ताहर): गोर-गरीब कुटुंबातील माताभगिनींनी कुटुंबाचा गाडा पुढे नेण्यासाठी मायक्रो फायनान्स्चे कर्ज घेतले आहे. ते कर्ज जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत जुलमी वसुली थांबवावी असे बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष भिसे यांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
जागतिक कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान मांडले आहे. हातावरचे पोट असणार्यांची बिकट अवस्था होऊन बसली आहे. यामध्ये कुटुंबातील माताभगिनींनी मायक्रो फायनान्स्च्या माध्यमातून कुटुंबाचा गाडा पुढे नेण्यासाठी कर्ज स्वरूपात घेतलेल्या रक्कमेच्या जुलमी वसुलीला तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकारने कित्येक उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले. तसेच या माताभगिनींनी घेतलेले कर्ज माफ होत नाही तोपर्यंत वसुली थांबविण्यात यावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे 23 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित, करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथील सहा.पोलीस निरीक्षक श्री.लांडे यांना सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष संतोष भिसे, भाऊसो हुंबरे, दीपक दणाने, विकास शेंडगे, बंटी गायकवाड, सचिन पाटोळे, रेश्मा दणाने, विद्या भिसे, संगीता खोमणे, छाया सोनवणे, जयश्री साखरे, रेखा कांबळे, स्वाती गायकवाड इ. उपस्थित होते.