इंदापुर(वार्ताहर): अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक, पत्रकार धनंजय कळमकर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र समितीचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, सल्लागार व दिल्लीचे सिनइर ऍडव्होकेट ऍड.एस.ए.येवते-पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संपादक धनंजय कळमकर यांनी पत्रकारितेमध्ये 21 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी नागरीक समता या साप्ताहिकाच्या माध्यमातून आपल्या लेखणीची सुरुवात केली. दैनिक बंधुप्रेम, अजोती वैभव साप्ताहिकामध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. साप्ताहिक सहकारवाणी, सध्या ते साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक म्हणून काम करत आहेत.तसेच शिवसृष्टी वेब पोर्टल युट्यूब चॅनेलच्या या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अन्यायांना, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना समितीच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे.
समितीबाबत अधिक माहिती देताना नूतन जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर यांनी सांगितले की, जागतिकीकरणामुळे व आर्थिक सुधारांमुळे देशाचा विकास होत आहे.परंतु असे असले तरी काही मुठभर लोकांनाच याचा फायदा होत असल्याने देशातील गरीब हा आणखी गरीबच होत आहे. त्यामुळे अशा लोकांचे जीवनमान उंचावण्याकरिता त्यांना शैक्षणिक,सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या समितीच्या माध्यमातून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.