बारामती(वार्ताहर): सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे मात्र, वेळ पडल्यास माहिती अधिकार, तक्रार सुद्धा देण्यास मागे पुढे न पाहणारे इंदापूर रोड लगत सोळुंके हॉस्पीटल बाहेरील चहा विक्री करणारे अनिल मोरे यांनी लॉकडाऊन व जनता कर्फ्युमध्ये पोलीसांना मोफत चहा देण्याचे व त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले. त्याची दखल घेत एसआरपी ग्रुपचे श्री.मुंडे व पोलीस कर्मचार्यांनी मोरेंचा शाल,पुच्छगुच्छ देवून सत्कार केला. सर्वांना अभिमान वाटेल असे काम केल्याने मोरेंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कित्येकांकडे घनो मालमत्ता संपत्ती आहे पण देण्याची दानत नाही. तर काहींना दुकानं कधी उघडतील व माझा गल्ला कधी भरेल याची वाट पाहणार्यां समोर एक आदर्श मोरेंनी ठेवला आहे. सतत रस्त्यावर अदृश्य शत्रूशी लढा देत पोलीस नागरीकांची सेवा करीत होते. सर्वत्र बंद परिस्थिती असल्याने चहाची सोय नव्हती. दवाखाना असल्याकारखाने रूग्ण व नातेवाईकांना चहा, दूध, गरमपाणी लागत असल्याने साध्या टपरीत चहाचा व्यवसाय करणार्या अनिल मोरे व त्यांच्या पत्नीने सुद्धा पोलीसांची सेवा केली.