बारामती(वार्ताहर): हप्ता बहाद्दर पोलीसांना घरी बसविणारे, नाव कार्य ऐकताच गुन्हेगार व अवैध धंदे करणार्यांना मनात धडकी भरेल असे कर्तव्यदक्ष डॉ.अभिनव देशमुख यांनी नुकतीच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली.
अवैध धंदे करणारे व त्यांची हुजरेगिरी करणार्यांना माझ्या हद्दीत अवैध धंदे करून दाखवा असे आव्हान करणारे श्री.देशमुख आहेत. यापुर्वी कोल्हापूर येथे प्रत्यक्षात करून दाखविले होते. कोल्हापूर व गडचिरोली याठिकाणी बजाविलेल्या कर्तव्याची दखल घेत गृहमंत्रालयाकडून त्यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदकाने गौरविण्यात आलेले आहे. ते स्वत: एमबीबीएस आहेत. युपीएससी च्या परिक्षेत यश मिळवून ते कस्टम विभागात सहा.आयुक्त झाले. त्यावर न थांबता त्यांनी आयपीएस ची तयारी करून यश मिळवून ठाणे, एसआरपी, सातारा व गडचिरोजी इ. ठिकाणी सक्षमपणे कर्तव्य बजाविले. हानी पोहचविणार्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घातला तर ज्यांनी सुधारण्याची तयारी दाखविली त्यांचे पुनर्वसन करणारे श्री.देशमुख आहेत.
सामान्य माणसाला पोलीस तुमचे मित्र आहेत हे रूजविण्याचा प्रयत्न त्यांनी आजपर्यंतच्या सेवेत केला आहे. कोल्हापुरात आलेल्या महापुरात त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली. डॉ.देशमुख व त्यांच्या पत्नी सुद्धा डॉक्टर आहेत. कोरोनाच्या महामारीत सुद्धा त्यांच्या पत्नीने कर्तव्यात कसूर केली नाही. सक्षमपणे मोफत सेवा बजावली.