आंध्र प्रदेशातुन महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला तब्बल 312 किलो गांजाराह 46 लाख रूपयाचा मुद्देमाल हस्तगत
बारामती(वार्ताहर): बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, प्रमोद पोरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचार्यांनी आंध्रप्रदेश येथुन महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला 312 किलो गांजा व 46 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कारवाई केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरचा गांजा वाहुन नेणारे अशोक लेलंड टेम्पो वाहन बारामती मार्गी जाणार असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना प्राप्त होताच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची परवानगी घेतली.
सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र टीम बनवुन धो-धो पडणारा पाऊस न पाहता पाटस व भिगवण रोडने येणार्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली. या रस्त्यालगत असणार्या हॉटेल व ढाब्यांवर थांबलेल्या वाहनांची तपासणी केली. रात्रौ 3 वाचे सुमारास उंडवडी येथील ड्रायव्हर ढाब्याजवळ पाटसहून बारामतीच्या दिशेकडे भरधाव वेगाने येणार्या अशोक लेलंड टेम्पोला सपोनि लंगुटे व पथकाने थांबण्याचा इशारा करूनही टेम्पो चालकाने टेम्पो न थांबवता बारामती दिशेने वेगात घेवुन जाऊ लागला. याबाबत संशय आल्याने सपोनि लंगुटे व पथकाने सरकारी वाहन व खाजगी कार मधुन सदर टेम्पोचा पाठलाग करून बर्हाणपुर फाटा येथे टेम्पोस वाहने आडवी मारून उभा केला.
सदर अशोक लेलंड टेम्पो क्रमांक एम.एच.10 सी.आर. 4326 ची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 46 लाख रूपये किमतीचा 312 किलो गांजा मिळाला. सदर टेम्पो
मध्ये असलेल्या चार इसमांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा हा विशाखापट्टम,आंध्रप्रदेश येथुन आणला असुन तो विक्रीसाठी दहिवडी (जि.सातारा) व सांगली येथे घेवुन जात असल्याची कबुली दिली आहे.
सर्व मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणुन गु.र.नं. क्र.581/2020 एनडी. पीएस. कायदा 1985 चे कलम 20(ब), 22 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गांजा विक्रीसाठी घेवुन आलेले इसम विजय जालिंदर कणसे, (वय-26, रा.कानरवाडी, ता.कडेगांव जि.सांगली, विशाल मनोहर राठोड, वय-19, रा.नागेवाडी, विटा, ता.खानापूर जि.सांगली) निलेश तानाजी चव्हाण (वय-32 वर्षे, रा.आंधळी, ता.माण,जि.सातारा) योगेश शिवाजी भगत (वय-22, रा.साबळेवाडी, शिसुफळ, ता.बारामती, जि. पुणे. यांना अटक करण्यात आली असुन तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख,अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब घोलप, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रमोद पोरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे, पोलीस हवालदार अनिल ओमासे,भानुदास बंडगर, दत्तात्रय सोननीस, पोलीस नाईक अनिल खेडकर, परीमल मानेर, पो.कॉ.रणजित मुळीक, सतोष मखरे, राजेंद्र काळे, प्रशांत राउत, अमोल नरूटे, दत्तात्रय मदने, नंदु जाधव, विनोद लोखंडे, भुलेश्वर मरळे, पोपट कवितके, मंगेश कांबळे,योगेश चितारे,चालक अबरार शेख यांनी कामगिरी केलेली आहे.