इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील व चालक मल्हारी मखरे यांच्यावर दि.24 रोजी झालेल्या जिवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर इंदापूर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी विनोद रासकर तसेच लक्ष्मण सुर्यवंशी यांना तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली.
आरपीआयचे कार्याध्यक्ष शिवाजी मखरे व तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 24 मे 2024 रोजी इंदापूरचे कर्तव्य दक्ष तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर वाळू माफियांनी जिवघेना हल्ला केला आहे. त्यामधून ते थोडक्यात बचावले, यानंतर पोलीसांनी तात्काळ काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु इंदापूर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी विनोद रासकर व लक्ष्मण सुर्यवंशी हे रात्रंदिवस या वाळु तस्करांचा पाठलाग करत असतात, त्यांना हॉटेलमध्ये किंवा नदिकाठी निर्जन ठिकाणी भेटतात, त्यामुळे या दोन पोलीसांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या जिविताच्या रक्षणासाठी त्यांना ताबडतोब झेड प्लस दर्जाचे पोलीस संरक्षण व ते वापरत असलेल्या मोबाईल फोनचे व त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल फोनचे सीडीआर व कॉल डिटेल्स तपासण्यात यावे अशी मागणी करण्यात आलीय. अन्यथा इंदापूर पोलीस स्टेशन समोर सनदशीर मागनि आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.
त्या दोन्ही पोलिसांचे वाळू माफियांशी लागेबांधे असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आलीय.