गौतमेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के : कु.सरिता राजमाने प्रथम

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये गौतमेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतंडी चा निकाल 100% लागला आहे.

उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये प्रथम कु.सरिता जयप्रकाश राजमाने 96.40%, द्वितीय कु. वैष्णवी राजेंद्र नलवडे 96.00% तर तृतीय क्र दीप्ती धनराज चव्हाण 94.00% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापक धनाजी मोरे सर यांनी दिली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर नलवडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!