त्यांचे विचार आत्मसात केल्यास खरा ऊर्स साजरा केल्यासारखा होईल – जाकिर रजा नूरी

बारामती(प्रतिनिधी): ताजुश्शरीया उर्फ अल्लमा अख्तर रझा खान यांचे उच्च विचार आत्मसात केल्यास त्यांचा खरा ऊर्स आपण साजरा केल्यासारखा होईल असे प्रतिपादन सुरतचे ऑल इंडिया कादरी मिशनचे सहायता जाकिर रजा नूरी यांनी केले.

जामा मशिद, बारामती याठिकाणी बुधवार दि.15 मे 2024 रोजी ताजुश्शरीया उर्फ अल्लमा अख्तर रजा खान यांच्या ऊर्सनिमित्त तालुश्शरीया कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित प्रवचनात जाकीर रजा नूरी बोलत होते.

नूरी पुढे म्हणाले की, ताजुश्शरीया यांचा जन्म 15 मे 1942 साली भारतातील उत्तर प्रदेश बरेली शहरातील सौदागरान जिल्ह्यात झाला. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचे वडील महान इस्लामिक विद्वान म्हणून ओळखले जाणारे ह.मौलाना इब्राहिम रजा यांनी त्यांच्या इस्लामिक अभ्यासाची सुरूवात केली.

3 नोव्हेंबर 1968 रोजी बरेली शरिफ येथे मौलाना हसनैन रझा खान यांच्या मुलीशी लग्न झाले. त्यांच्या पश्र्चात एक मुलगा व पाच मुली आहेत.

नूरी पुढे म्हणाले की, अल्लाहने सांगितले आहे माझ्यावर प्रेम करा पण माझ्यावर प्रेम करण्यापूर्वी मोहम्मद पैगंबर (स.) यांच्यावर प्रेम करा मग मी प्रेम करणार्‍यावर अतिप्रेम करेन. अल्लाहने तमाम मुस्लीम बांधवांना सांगितले आहे मोहम्मद पैगंबर (स.) यांची नक्कल करीत इस्लामच्या अटी शर्तीचा मान राखा. यावेळी त्यांनी नक्कलीचे दोन प्रकार सांगितले यामध्ये नकल बराये नकल आणि नकल बराये मोहब्बत याबाबत उदाहरण देत सविस्तर माहिती दिली.

अल्लाह असेही सांगतात की मोहम्मद पैगंबर (स.) यांची नकल बराये नकल करू नका तर नकल बराये मोहब्बत करा जो असे करणार नाही त्याच्यावर मी म्हणजे अल्लाह नाराज होतील. बरेली शरिफ येथील रजा कुटुंबियांनी इस्लाममधल खर्‍या व खोट्याची ओळख मुस्लिम बांधवांना करून दिली आहे.

मोहम्मद की मोहब्बत दिने
हक की शर्त अव्वल है।
इसमे हो अगर खामी
सबकुच नामुक्ममल है।

नमाजे हमपे खुदाने
किया है फर्ज मगर,
बगैर हुक्ममें नबीके
अदा न करे

इस्लामचे अटी व शर्तीचे पालन करताना खर्‍या व खोट्याची जाणीव मुस्लीमांना असली पाहिजे. बरेली शरिफचे आला हजरत यांनी इस्लामबाबत मुस्लिमांमध्ये खर्‍याची ओळख निर्माण करून दिली आहे. इस्लामच्या खर्‍या अटी व शर्तीचे जीवनात पालन केल्यास करन्सी मिळेल. ही करन्सी फक्त स्वर्ग व नरकात जाताना त्याचा हिशोब पाहिला जाणार आहे असेही नूरी यांनी यावेळी सांगितले.

अल्लाह असेही सांगतात की मोहम्मदसे वफा तुने तो हम तेरे है, ये जहॉं चीज है क्या लोहो कलम तेरे है म्हणजे मोहम्मद पैगंबर(स.) यांची गुलामी केली तर ज्या ठिकाणी लोकांचे पाप-पुण्य लिहिले जातात ते लिहण्याचा पेन व वही अल्लाह तुम्हाला बहाल करेल. तुम्ही जर पैगंबराशी इमाने-इतबारे राहणार नाही तो समाजात त्याने कितीही पुण्य, नमाज, दान-धर्म केलेले असले तरी तो शून्य आहे.

ताजुश्शरीयाबाबत बोलताना नूरी म्हणाले की, अल्लाह व मोहम्मद पैगंबर(स.) यांच्याशी प्रेम कसे करावे हे त्यांच्याकडून शिकावे तेवढे कमी आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षापर्यंत अल्लाह व मोहम्मद पैगंबर(स.) यांनी सांगितलेले इस्लामचे सर्व नियम व अटींचे तंतोतंत पालन केले. शेवटच्या क्षणापर्यंत नमाज पठण करण्याचे ताजुश्शरीया यांनी कधीही सोडले नाही. ताजुश्शरीया यांच्यासारखे नमाजी होण्याचे सर्वांनी ठरविले पाहिजे असेही ते म्हणाले.

ताजुश्शरीया यांचा चेहरा पाहणारे मंत्रमुग्ध होत होते. एखाद्या कार्यक्रमात ते गेल्यास सर्वांच्या नजरा त्यांना पहात होत्या. इस्लामच्या तत्वावर जीवन व्यथित करणारे ते होते. वयोवृद्ध काळात त्यांना पकडल्याशिवाय चालता येत नव्हते. अशा परिस्थितीत सुद्धा ते नमाज पठण करण्यास विसरले नाही हे खुप वाखण्याजोगे आहे. नमाज पठण करताना त्यांनी कोणाचाही आधार न घेता नमाज पठण करताना उठ-बैस करीत होते. नमाज पठण करताना त्यांना दैवीशक्ती येत होती असेही नूरी यांनी प्रवचन करताना सांगितले.

ताजुश्शरीया ज्या दिवशी पैगंबरवासी झाले ती वेळ 20 जुलै 2019 ला सायंकाळी होणार्‍या अजान (बाग) च्या वेळी अल्लाह..अल्लाह…अल्लाह अकबर म्हणत त्यांचा देह स्वर्गवासी झाला. विशेष म्हणजे जाण्याच्या आधी असर (तिन्हीसांज)ची नमाज त्यांनी पठण केली होती. यावरून त्यांनी त्यांच्या अनुयायांना कितीही संकटे, वाईट प्रसंग आले तरी नमाज पठण करण्याचे सोडू नका हा अमूल्य संदेश त्यांनी देवून गेले आहेत.

ताजुश्शरीया यांचा भारतासह इतर देश-विदेत असंख्य चाहते व अनुयायी आहेत. मुस्लीमांबरोबर हिंदू समाजातील लोकं सुद्धा त्यांचा आदर करीत होती. त्यांनी त्यांच्या साहित्यात आणि कृतीतून इस्लामच्या शत्रूंवर हल्ला केला आहे. सत्याची कास त्यांनी कधी सोडली नाही. त्याचा प्रचार व प्रसार करीत भारतातील नव्हे तर जगभरातील मुस्लीमांना इस्लामचे रक्षण करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी मौलाना लोकांचा खुप आदर केला. त्यांनी खुप पुस्तके लिहिली आहेत. कित्येक शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक इस्लामिक संस्था आजही त्यांच्या मार्गदर्शन व नावाखाली चालतात. कित्येक विद्यार्थी मौलाना त्यांनी घडविलेले आहेत.

1963 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी इजिप्तच्या प्रसिद्ध अल अझहर विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. तीन वर्ष त्याठिकाणी पवित्र कुराण व हदीसचा गाढा अभ्यास केला. पहिल्यापासून ते प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक पटकावित होते. त्यांनी स्मरणशक्ती तगडी होती. अरबी भाषेवर प्रभुत्व होते. या विद्यापीठाती सर्वोकृष्ठ परदेशी विद्यार्थ्यांपैकी एक होण्याचा मान त्यांनी पटकावला होता. जामीया अझहर पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. आला हजरत बरेली शरिफ यांनी सांगून ठेवले होते माझा उत्तराधिकारी ताजुश्शरीया असेल. यावेळी तमाम मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या प्रवचनास उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!