इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): गोतंडी तालुका इंदापूर येथे तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब रुपनवर व मंडल कृषी अधिकारी राजू घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचे प्रात्यक्षिका घेण्यात आले.
यावेळी कृषी प्रवेशक सचिन चितारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हुमणी अळीची ओळख व जीवन क्रम सांगितला कृषी सहाय्यक शुभांगी बरळ प्रात्यक्षिका करताना म्हणाले की, अंडी, अळी, कोष व भुंगेरा या हुमणीच्या चार अवस्था असून वळीवाचा पहिला पाऊस पडला की जमिनीमध्ये सूप्त अवस्थेमध्ये असलेली भुंगेरे बाहेर पडतात व शेताच्या बांधावर असणाऱ्या कडूनिंब, बोर आणि बाभूळ या झाडांवर आपली उपजीविका करतात हा एक भुंगेरा कमीत कमी ५० ते ६० अंडी जमिनीमध्ये घालतात व अंड्यामधून दहा ते पंधरा दिवसांनी आळी बाहेर पडते ही आणि अवस्था पाच ते सात महिन्यांची असून पिकांचे सर्वात जास्त नुकसान हे या आळी मुळे होते. त्यामुळे हुमणी भुंगेरा अवस्थेच नियंत्रण करणे आवश्यक आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये असणाऱ्या कडुनिंब, बोर, बाभूळ झाडाखाली ३×३×२ फूट आकाराचा खड्डा घेऊन त्यात पिवळा कागद टाकावा. तो खड्डा रॉकेल मिश्रित पाण्याने भरून त्यावरती विजेच्या बल्ब लावावा रात्रीच्या वेळी भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होऊन पाण्यात पडून मरतात व हुमणीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकते अशी माहिती शुभांगी बरळ यांनी शेतकऱ्यांना दिली