इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेली लहुजी शक्ती सेना बारामती मतदार संघात सक्रिय झाली आहे.सुनेत्रा पवार यांनाच मतदान का करावे यासाठी मतदार संघाच्या प्रत्येक वाडी,वस्तीवर,गावागावात फिरुन मतदारामध्ये जनजागृती करून सुनेत्रा पवार यांना निवडुन आणण्यासाठी प्रचार दौरे सुरू असल्याची माहिती लहुजी शक्ति सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता जगताप यांनी दीली.
लहुजी शक्ति सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांचे नेतृत्वाखाली संपुर्ण राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ तयारीला लागले आहेत.मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लहुजी शक्ति सेना महाराष्ट्रात खारीचा वाटा उचलणार आहे.त्यादृष्टिने सध्या प्रचार सुरू आहे.महा- विकास आघाडीच्या उमेदवाराला जास्तित जास्त मतदान करावे यासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन महाविकास आघाडीने राज्यभरात केलेल्या विकास कामांची माहीती देवून प्रचार सुरू आहे.
लहुजी शक्ति सेना प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात विविध गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला.यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता जगताप म्हणाले की महाविकास आघाडीने लहुजी शक्ति सेनेला दिलेला शब्द पाळला आहे, संगमवाडी येथे आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
महायुती सरकारने समाजाला न्याय देताना बार्टीच्या धर्तीवर आर्टीची डॉ.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्मिती करून त्यासाठी प्रति वर्ष मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना MPSC,UPSC व विविध स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, देशातील नामांकित संस्थेत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे इत्यादी अनेक बाबीमुळे समाजातील मुलांचे शिक्षण व नोकरतील प्रमाण वाढणार असल्याने लहूजी शक्ति सेना महाविकास आघाडीत सामिल झाल्याचे दत्ता जगताप यांनी सांगीतले.