आपला भारत देश माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असून, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अंध:श्रद्धेचे पुरस्कृत आहे का? असा सवाल तमाम भारतीय जनतेला पडलेला आहे. पुण्यात रेसकोर्स याठिकाणी झालेल्या सभेत “आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही ते दुसर्याच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात.“ असे विधान करून अंध:श्रद्धेला खतपाणी घातल्याचे दिसत आहे. जादूटोणाविरोधी कायदा (महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,2013) नुसार गून्हा आहे तो मोदींनी केलेला दिसत आहे.
माणूस मेल्यानंतर अतृप्त आत्मा भटकतो व कुणाच्याही शरीरात प्रवेश करून आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतो अशी कल्पना आहे, खरे तर लहानपणापासून भूत असण्याचे संस्कार झालेले असतात. भूत चिंचेच्या, पिंपळाच्या झाडावर असते, वेगळी भाषा बोलते, त्याच्यात प्रचंड ताकत असते वैगरे. माणूस मेल्यानंतर त्याचा अतृप्त आत्मा भटकत असतो व तो कुणालाही झपाटतो, कुठे तो मुंजा लावडीन तर कुठे चुडेल या नावाने ओळखल्या जातो, परंतु मेडिकल सायन्स आत्मा मानत नाही. कारण मेडिकल सायन्सने आत्मा शोधला पण सापडला नाही ज्या गोष्टीचा पुरावा नाही ती गोष्ट विज्ञान मानत नाही, याचाच अर्थ या जगात भूत नसते भूत माणसाच्या डोक्यात असते, खरे तर माणूस मेल्या नंतर सर्व ब्रेन तंतू नष्ट होतात, त्यामुळे आठवण, ओळख या गोष्टीच शिल्लक राहत नाही. तरी भूत झपाटते, अंगात येते. भूत तीन प्रकारे माणसाला लागते एक म्हणजे सजेशन ने लागणारे भूत, दुसरे ढोंग यालाच म्यालीगरिंग असे म्हणतात व तिसरे गंभीर मानसिक आजार एवढं सगळे विज्ञान सांगत असताना सुद्धा देशाचे पंतप्रधान थेट अतृप्त आत्माबाबत भर सभेत बोलत असतील तर पंतप्रधान अंध:श्रद्धेचा प्रसार व प्रचार करीत असल्याचे यातून दिसत आहे.
आपण मुलांना बालपणा पासून तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला शिकवले तर तो प्रत्तेक गोष्टीची चिकित्सा करेल, अत्मात्विश्वास बाळगेल व वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करेल. यानंतर त्याला भूत कधीच लागणार नाही. आत्मविश्वास, चिकित्सा, व वैज्ञानिक दृष्टीकोन ज्याच्याकडे असेल त्याला भूत कधीच झपाटणार नाही. प्रबोधनाने असे शक्य आहे. या जगात भूत नसते ते माणसाच्या डोक्यात असते ही गोष्ट अगदी खरी आहे. याबाबत मोदींनी प्रबोधन करण्याचे सोउून अतृप्त आत्माबाबत बोलून या सभेत असणार्यांची नक्कीच झोप उडवली असेल.
म्हणतात ना, निवडणुका आल्यावर नेते, कार्यकर्त्यांच्या अंगात येत असे म्हटले जाते. अंगात येणे म्हणजे काहीही करणे, काहीही बोलणे व कोणतीही कृती करणे होय. देशाचे पंतप्रधान ज्या संविधानाच्या आधारे पंतप्रधान झाले त्याच संविधानाच्या मूल्याचा अपमान करतात, जातीवर बोलतात दोन समाजात तेढ निर्माण करतात. देशात विविध विषय असताना अंध:श्रद्धा, संविधानाच्या मूल्यांचा अपमान असे वक्तव्य करून पदाचा अवमान करीत आहेत. त्यामुळे अशा पंतप्रधानाचा काय आदर्श घ्यावा हा खरा प्रश्र्न सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे. त्यामुळे येणार्या काळात अशा पंतप्रधानांचे विचार न घेता जनतेने तर्कबुद्धीने विचार करावा, बुद्धीप्रामाण्यवादी बनावे, व विज्ञाननिष्ठ व्हावे हीच अपेक्षा.