कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा भारतीय युवा पँथर लवकरच निर्णय घेणार

बारामती: राजकारणातील किंगमेकर म्हणून समजले जाणारे विधान परिषदेचे मा.अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर यांची सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या भारतीय युवा पँथरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली.

सध्या राजकारणात सुरू असलेली उलथापालथ यामुळे वेगळा रंग आलेला दिसत आहे. यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संघटनांना कोणाला पाठिंबा द्यावा हा विषय ऐरणीवर येऊन पडला आहे. भारतीय युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अनिकेत निंबाळकर यांच्याशी समन्वय व संवाद साधला. विविध विषयांवर चर्चा केली. येणार्‍या काही दिवसातच भारतीय युवा पँथर आपली भूमिका स्पष्ट करेल असे यावेळी अहिवळे यांनी सांगितले.

भारतीय युवा पँथरच्या माध्यमातून करीत असलेल्या कामातून दलित तरूणांना विशेषत: दु:खी, पिडीत, शोषित, वंचित समुदायांच्या हक्कांसार्ठी व अन्यायाने दबलेल्या जनतेला दिलासा मिळत आहे. गौरव अहिवळे यांनी संघटनेची मजबुत बांधणी करून संघटनेला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे. यामाध्यमातून निस्वार्थ शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. एखाद्या पिडीतावर झालेल्या अन्याय व शोषणा विरोधात आवाज उठवून संघर्ष करून त्यास न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय युवा पँथर करीत आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत होऊन बसली आहे.

सध्या लोकसभा निवडणूका सुरू आहेत. लोकसभेत त्याच ताकदीचा उमेदवार गेला पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची ही निवडणूक नसून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 79 च्या तरतुदीनुसार लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाची संख्या 552 आहे, अशा ठिकाणी त्याच पटीचा दर्जेदार उमेदवार पाठविणे हा सर्व मतदारांचा हक्क व अधिकार आहे याची जाणीव येत्या काळात लवकर मतदारांना करून देण्यासाठी भारतीय युवा पँथर काम करणार असल्याचेही अहिवळे यांनी सांगितले आहे.

भारतीय युवा पँथर विचार विनीमय करूनच कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावयाचा याचा सखोल निर्णय येत्या काही दिवसात घेणार असल्याचेही संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!