बारामती: राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अभियंता सेलच्या सरचिटणीसपदी बारामतीचे सोहेल गुलमोहम्मद शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र प्रदेश अध्यक्ष हाजी डॉ.अमिन अब्दुलअझिझ शेख यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उच्च आदर्शानुसार पक्षाची वाटचाल सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियंता सेलचे राज्यप्रमुख हाजी डॉ.अमिन अब्दुलअझिझ शेख यांच्या शिफारशीनुसार अजित पवार यांच्या दृष्टीकोनातून समाजाच्या सर्व स्थरातील व विशेषत: तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पोहोचणे आवश्यक आहे व तेच विचार घेऊन अभियंता सेलचे काम सुरू आहे.
अजित पवार यांच्यासमोर असलेले ध्येय व त्या दृष्टीकोनातून या विभागाचे महत्व ओळखुन व सुयोग्य असे काम करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्वल करेन असा विश्र्वास सोहेल शेख यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करीत आलेला पक्ष आहे. येणार्या काळात नवनव्या अभियंतांना या सेलच्या माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात येतील. त्यामुळे सर्व अभियंत्यांनी पक्षाला व पक्षाच्या अभियंता सेलला साथ द्यावी त्याच पटीत पक्ष व पक्षातील अभियंता सेल खंबीरपणे पाठीशी उभे राहील असेही ते यावेळी म्हणाले.
सोहेल शेख यांच्या नियुक्तीमुळे बारामतीत सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यात सक्रीय सहभाग असणारे सोहेल शेख आहेत. अजितदादांच्या निकटवर्ती म्हणून सोहेलच्या वडिलांचा उल्लेख केला जातो.