बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): येथे विकास कामे होत असताना, अजित पवारांच्या जवळची काही मंडळी मनमानी कारभार करून अजित पवारांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात त्यातीलच एक प्रकार म्हणजे जुनी भाजी मंडईतील ओटे धारकांना तात्पुरत्या स्वरूपात बांधून दिलेले पत्राशेड गाळे बेकायदेशीररीत्या बांधले असल्याने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात बारामतीतील एका युवकाने जनहित याचिका दाखल केली आहे त्यामुळे हे गाळे पडणार असल्याचे बारामती शहरातील चौका-चौकात बोलले जात आहे.
बारामतीत कोणतेही विकास कामे होत असताना त्याठिकाणच्या किंवा आसपासच्या लोकांना त्रास होऊ नये किंवा त्या लोकांचे तात्पुरत्या स्वरूपात पुर्नवसन व्हावे अशी अजित पवार यांची मनोधारना असते. मात्र, काही अतिघाई करणारे कार्यकर्ते मात्र, अजित पवारांच्या बेकायदेशीररीत्या कामे करून त्यांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न करीत असतात, पण त्यांचा सर्व प्लॅन फिसकटला जातो आणि तो थेट अजित पवारांना अडचणीत आणण्याचा ठरतो.

बारामती नगरपरिषदेच्या मालकीच्या जुनी भाजी मंडई याठिकाणी उभारण्यात येणार्या भव्य-दिव्य शॉपिंग सेंटरच्या जागेत असणारे ओटे धारकांना तात्पुरत्या स्वरूपात बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत तेही रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पत्राशेड गाळे उभारण्यात आले आहे. सदरच्या गाळ्यांना बारामती नगरपरिषदेची कोणतीही परवानगी नसल्याचे कळते किंवा तसा ठराव सुद्धा झालेला दिसत नाही. या शॉपींग सेंटरमध्ये कोणत्या मजल्यावर, किती नंबरचा गाळा मिळेल हे या ओटे धारकांना बारामती नगरपरिषदेने कोणतेही लेखी स्वरूपात पत्र सुद्धा दिलेले नाही. त्यामुळे या ओटे धारकांनी इकडे आड तिकडे विहीर होऊन बसले आहे.
नगरपरिषदेने कोणतेही लेखी दिले नाही. बेकायदेशीर गाळे उभारले, आता हे गाळे पडणार पुन्हा ओटे धारकांची धांदल उडणार, पुन्हा भरलेला दुकानातील माल दुसरीकडे स्थलांतर करणे यामध्ये दुकानदार मेटाकुटीला येणार. भिक नको मात्र, कुत्रं आवर अशी अवस्था येथील ओटे धारकांनी होऊन बसली असल्याचेही बोलले जात आहे.
बारामतीतील एका युवकाने मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात जनहित याचिका दाखल केली असल्याचे समजते दि.2 मे 2024 रोजी बारामती नगरपरिषदेस याबाबत म्हणणे दाखल करण्यासाठी सांगण्यात आल्याचे कळत आहे. यामुळे सदरचे गाळे बेकायदेशीर उभारून तो ओटे धारकांना वाटण्याचा अट्टाहास कोणाचा? त्यामुळे बारामती नगरपरिषद याबाबत उच्च न्यायालयात कोणते म्हणणे देणार यावर निकाल ठरणार आहे.
बारामतीच्या राजकारणात काही मंडळी अजित पवार यांना सतत अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अजित पवार अशा मंडळींना कशासाठी जवळ करतात हेच अद्याप बारामतीच्या नागरीकांना कळाले नाही. या लोकांनी तर जसे की गाळे आम्हीच तुम्हाला देत आहोत असा आव आणून गाळे वाटप केले. बारामती नगरपरिषदेने या गाळ्यांसाठी तब्बल 7 ते 8 कोटी खर्च केल्याचेही बोलले जात आहे.
सदर शॉपींग सेंटर बांधण्याचा ज्यांनी ठेका घेतला आहे त्यांनी खरी या ओटे धारकांनी सोय करणे गरजेचे असताना, बारामती नगरपरिषदेने एवढी मोठी रक्कम खर्च करून ती ही कोणतीही परवानगी, ठराव न घेता केल्याने या नुकसानीस कोण जबाबदार? हा खरा प्रश्र्न समोर आलेला आहे.
या बेकायदेशीर उभारलेल्या गाळ्यांमुळे वाहतुक कोंडी, छोट्या-मोठ्या चोर्यांमध्ये वाढ झालेली असल्याचेही बोलले जात आहे. या गाळेधारकांना शौचालय, पाणी विशेषत: सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे सदरील गाळाधारक घरी झोपला तरी त्याचे सर्व लक्ष दिलेल्या पत्राशेड गाळ्याकडे असते.