करण इंगुले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरी

बारामती ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष करण इंगुले यांच्या वाढदिवसा निमित्त करण अण्णा इंगुले मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर, नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनीटायझर, हॅन्ड ग्लोज तसेच गरजू नागरिकांना धन्यवाटप अश्या विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.

सध्या कोरोना सारख्या भयावह परिस्थितीत बारामतीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे अश्या परिस्थितीत ब्लड बँकेच्या अह्वानास प्रतिसाद देत येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट मानिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिबिराचे उद्घाटन बारामतीचे तहसीलदार विजयसिंह पाटील, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, नगरसेवक अमर धुमाळ, कारण इंगुले ब्लड बँकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एन धवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. रक्तदात्यांनी उत्फूर्तपणे रक्तदान करून सहकार्य केले.

तर कोरोनाच्या काळात बारामती नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस बारामती स्वच्छ करीत आहेत अश्या 122 सफाई कर्मचारी यांना मास्क, सॅनीटायझर, हॅन्ड ग्लोजचे करण इंगुले यांच्या तर्फे वाटप करण्यात आले यावेळी त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे यांच्या सहकार्य केले तर यावेळी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. तर बारामतीत नुकताच जनता कर्फ्यूमुळे अनेक गरजू नागरिकांना रोजच्या उदार निर्वाहासाठी घरात धन्य नसल्याचे अनेकांनी सागीताल्यावरून त्यांना ध्यान्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण अण्णा इंगुले मित्र परिवारातील सद्स्य आणि मित्र मंडळी यांनी परिश्रम घेतेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!