पोलीस तपासात, बातमी लावण्यास हस्तकामार्फत पैसे देणारा मूळ आरोपी असिफ जाफर बागवान यांच्यासह हाजी अमजद अजिज बागवान, मुख्तार उस्मान बागवान, हाजी फिरोज अजिज बागवान, अस्लम फकीर बागवान, सलीम (बाळू) अब्दुल बागवान यांचा समावेश
बारामती(प्रतिनिधी): येथील शगनशाह मशिद याठिकाणी सुरू असलेला दारूल ऊलूम युनिसिया या मदरस्यामध्ये कोट्यावधी रूपयांचा झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणारा सामाजिक कार्यकर्ता सोहेल शेख (बागवान) याच्यावर या-ना त्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसाच प्रकार, एका वृत्तपत्रात बातमी लावण्यास हस्तकामार्फत पैसे देणारा मूळ आरोपी असिफ जाफर बागवान याच्यासह हाजी अमजद अजिज बागवान, मुख्तार उस्मान बागवान, हाजी फिरोज अजिज बागवान, अस्लम फकीर बागवान, सलीम (बाळू) अब्दुल बागवान यांनी भ्रष्टाचार बाहेर काढणार्या फिर्यादी, सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख (बागवान) यांची बदनामी होईल अशी बातमी प्रसिद्ध करण्यास सांगून आरोपी असिफ जाफर बागवान याच्या हस्ते संबंधित वृत्तपत्रास रूपये 25 हजार दिले आणि बातमी प्रसिद्ध केली.
बातमी प्रसिद्ध झालेनंतर हे वरील आरोपी वृत्तपत्र विक्रेते याप्रमाणे चौका-चौकात, गर्दीच्या ठिकाणी वृत्तपत्र स्वत:च वितरीत करीत होते. मात्र संबंधित वृत्तपत्रावर गु.र.नं.441/2020 अन्वये 354-ए(1), 354-ए(3), 419 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67(ए), 66(ए), (बी),(डी), प्रेम आणि नोंदणी पुस्तक अधिनियम 1867 चे कलम 14,15 अन्वये महिला फिर्यादीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्यात पोलीस तपासाकामी संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांनी असिफ जाफर बागवान, हाजी अमजद अजिज बागवान, मुख्तार उस्मान बागवान, हाजी फिरोज अजिज बागवान, अस्लम फकीर बागवान, सलीम (बाळू) अब्दुल बागवान यांनी मजकुर छापणेसाठी 25 हजार रूपये असिफ जाफर बागवान याने हस्तकामार्फत दिले असल्याचे पुढे आले.
बातमी प्रसिद्ध करण्यास वरील आरोपींनी पैसे दिल्याने या गुन्ह्यात हे वरील मंडळी तेवढेच गुन्हेगार आहेत हे कळताच या आरोपींनी मे.सेशन कोर्ट (मे.एस.टी.भालेराव साहेब) येथे अटकपूर्व जामीन मांडला. दि.17 सप्टेंबर 2020 रोजी मे.अति.सेशन जज्ज एस.टी. भालेराव साहेबांनी जामीन मंजूर केला. जामीन मंजूर केलेल्या आदेशात मे.कोर्टाने सदर प्रकरणात जामीन अर्ज केलेल्या अर्जदार तपासाकामी सहकार्य करतात. या अर्जदारांनी साक्षीदारास दबाव व धमकी देऊ नये. या प्रकरणातील तपासी अधिकारी यांच्यासमोर दि.19 व 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दु.1 वाजेपर्यंत हजर रहावे. पूर्वपरवानगीने भारत सोडणार नाही असे आदेश प्रारीत केलेले आहे.
आरोपींपैकी माजी उपनगराध्यक्ष असिफ जाफर बागवान, विद्यमान नगरसेविका यांची मुले यामध्ये माजी नगरसेवक अमजद अजिज बागवान व फिरोज अजिज बागवान यांना तर राजकीय वारसा असताना ही मंडळी मदरस्यातील कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार्या सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख (बागवान) याच्यावर दबावतंत्राचा वापर करून सामाजिक कार्याचा आव आणीत असतील तर समाजाचे रक्षकच भक्षक झालेचे दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उच्च विचार घेत निवडणूक लढवून ही मंडळी समाजासमोर आलेली आहेत. मात्र, भ्रष्टाचार बाहेर निघू नये व महिलांची बदनामी करण्यास वृत्तपत्रात बातमी येण्यासाठी पैसे मोजत असतील तर पक्षाच्या दृष्टीने ही खूप निंदनीय बाब असल्याचे संपूर्ण बारामती शहरात चर्चेचा विषय बनला आहे.