बारामती(वार्ताहर): येथील लेखनिने वादग्रस्त या साप्ताहिकाचा संपादक संतोष पोपट जाधव (रा.वसंतनगर, बारामती) याच्यावर घरात घुसून मारहाण व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनला दि.18 सप्टेंबर 2020 रोजी गु.र.नं.470/2020 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी संतोष जाधव याने फिर्यादी महिलेच्या अनाधिकाराने घरात घुसून फिर्यादीचा मुलगा आशिष यास शिवीगाळ करू लागला. आरोपी जाधव याने फिर्यादीचा डावा हात धरला, फिर्यादीने विरोध केला असता फिर्यादीच्या अंगास झटुन, अंगावरील कपडे फाडुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी त्याच्या तावडीतुन सुटुन पळत असताना आरोपी जाधव याने त्याच्या हातात असलेली काठी फिर्यादीच्या उजवे हातावर मारुन जखमी केले असल्याची फिर्याद त्रस्त महिलेने दिली.
त्यानुसार भादवी कलम 354, 452, 324, 294, 504, 506,269,270 साथीचे रोग 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.डोईफोडे करीत आहेत. सतत समाजात असंतोष निर्माण करणारा आरोपी संतोष असल्याचे वसंतनगर मध्ये चर्चेला उधान आले आहे.
सार्वजनिक कामात एखाद्या पक्षाने लोकहितार्थ कार्यक्रमात अडथळा घालणे, शासनाच्या अधिकारी कर्मचार्यांना तक्रारी करणे, राजरोसपणे बेकायदेशीर वाळूचे ट्रक, ट्रॅक्टर अडविणे, एखाद्या नव्याने उद्योग उभारणीस सुरूवात केली असता त्या उद्योगाचे फोटो काढणे त्यास त्रास देणे, उपोषणाचा इशारा देवून वेठीस धरणे असेही सार्वजनिक ठिकाणी असंतोष निर्माण होईल असे कृत्य हा आरोपी संतोष करीत असल्याबाबतही चौका-चौकात विशेषत: वसंतनगरमध्ये कानोसा घेतला असता, त्रस्त नागरीक दबक्या आवाजात बोलताना दिसत होती. वसंतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या आरोपीवर कारवाई झाल्याचे समाधान व्यक्त करताना दिसत होते.