बारामती(वार्ताहर): 25 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. सोशल डिस्टन्स्चे पालन करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) सलग्न पारधी समाज आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी फासेपारधी समाजाचे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
स्वातंत्र्यानंतरही पारधी समाज हलाकीचे जीवन जगत आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी शासन व प्रशासन अपयशी ठरत आहे. यापुर्वीही बारामतीचे तहसिलदार यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. याबाबत प्रशासनाने आजतगायत कोणताही पत्रव्यवहार केला नाही दखल घेतली नाही. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी जाहिर निदर्शने आंदोलन करणार असल्याचेही दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.