हिंदुस्तान जनता पार्टीच्या वतीने बारामती लोकसभेतून सौ. सविता भीमराव कडाळे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): दि. 18 रोजी हिंदुस्तान जनता पार्टीच्या वतीने सौ. सविता भिमराव कडळे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला , पवार घराण्या विरोधात आता होणार कडवी झुंज बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये जे पवार विरोधात पाच साडेपाच लाख मतदार आहेत हे मतदार पवार घराण्याच्या विरोधात मतदान करून हिंदुस्तान जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणतील असा विश्वास अखिल भारतीय सम्राट सेना अध्यक्ष भिमराव कडाळे पाटील यांनी व्यक्त केला.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये, ही निवडणूक पवार विरुद्ध पवार राहिली नसून पवार विरुद्ध इतर सारे जण अशी चुरशीची निवडणूक झाली आहे या निवडणुकीमध्ये पवार घराण्या व्यतिरिक्त उमेदवार निवडून येणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला, तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात प्रमुख्याने सहा तालुके येतात यामध्ये दौंड इंदापूर बारामती सासवड भोर वेल्हा, असे तालुके येतात परंतु सर्वात जास्त विकास हा फक्त बारामती तालुक्याचा करण्यात आला आहे

बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून या मतदारसंघात जेवढे तालुके येतात त्या सर्व तालुक्यांचा विकास कोणी गरजेचे आहेया मतदारसंघात जेवढे तालुके येतात त्या सर्व तालुक्यांचा विकास होणे गरजेचे आहे परंतु बारामती वरच लक्ष केंद्रित केले जात आहे यामुळे सध्या बारामती तालुका वगळता इतरत्र ठिकाणचा उमेदवार निवडून यावा म्हणून आणि इतर तालुक्याचा विकास व्हावा म्हणून ही उमेदवारी दाखल केली असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सविता कडाळे पाटीलांनी सांगितले यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलीपराव आगलावे , शंकर बोडके बाळासो कडवळे सुनिता ताई खंडाळकर सविताताई चित्ते आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!