इंदापूर मध्ये अजित पवार गटात उभी फूट : आप्पासाहेब जगदाळे शेकडो कार्यकर्त्यांसह करणार शरद पवार गटात प्रवेश…

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके) बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये माहायुती व महाविकास आघाडी कडून ताकत लावली जात आहे. त्यातच उद्या इंदापूर मध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे अजित पवार गट सोडून शरद पवार गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याने इंदापूर मध्ये अजित पवार गटात उभी फूट पडणार आहे. शरद पवारांनी इंदापूर मध्ये अजित पवार गटाला मोठा धोबीपछाड दिले आहे.

आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने व आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून स्वबळावर एक हाती अजित पवार गटाची इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता आणली होती.

त्या अगोदर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध निवडून गेले होते. हेच आप्पासाहेब जगदाळे उद्या स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत. आप्पासाहेब जगदाळे यांच्या शरद पवार गटात जाण्याने सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसणार असून अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

त्यामुळे चालू असलेले लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांच्याच गटातील एक एक मोहरे शरद पवार गटात सामील होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!