पुणे (प्रतिनिधी प्रज्ञा आबनावे)ः भारतीय संस्कृतीत ‘चौत्र शुद्ध प्रतिपदा‘ हा दिवस ‘महापर्व‘ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा‘ म्हणून साजरा करतो. या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी हडपसर येथे महिलांची भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली षिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे व उल्लासभाऊ तुपे यांच्या मार्गदर्षनाखाली काढण्यात आली होती. या रॅलीतून हिंदू संस्कृतीची एक झलक, समृध्दी, महिला सक्षमीकरण आणि एकतेचा संदेष देण्यात आला.
प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते.
यावेळी भगवे ध्वज, पारंपरिक पोषाख, भारत माता की जय, जय षिवाजी जय भवानी च्या घोषणाने शहर दणाणून गेले होते. चौकाचौकात पुष्पवृष्टी करत रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचे मनोबल वाढविण्याचे काम युवकांनी केले.
या रॅलीत बहुसंख्य महिलांबरोबर षिवसेनेचे पदाधिका-यांनी उपस्थिती दर्षविली होती. या रॅलीस प्रज्ञा मंगेष आबनावे, शीतल गाडे, सलोनी गुंजाळ व ज्योती अभंगे यांचे सहकार्य लाभले.