बारामती(वार्ताहर): दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आलताफ हैदर सय्यद व मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहरातील 300 कुटुंबियांना शिर्रर्खुमा बनवण्यासाठी लागणार्या पदार्थांचे मोफत वाटप माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या शुभहस्ते दि.8 एप्रिल 2024 रोजी दु.3.30 मी. डेंगळे गार्डन, माळेगाव रोड, कसबा बारामती याठिकाणी होणार असल्याचे आलताफ सय्यद यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष इद्रीस नाईकवडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुर्हाण यांच्या विशेष उपस्थितीत व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, युवक शहराध्यक्ष अविनाश बांदल, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद आणि बारामती बँकेचे संचालक शिरिष कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मरहम लगा सको तो किसी गरीब के जख्मों पर लगा देना, हकीम बहुत हैं बाजार में अमीरों के इलाज खातिर याप्रमाणे गेली 17 वर्षे अखंपणे मुस्लीम समाजातील गरीब, दु:खी पिडीत व गरजुंना मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, सहारा फौंडेशनचे परवेज सय्यद व एकता मित्र परिवाराच्या वतीने शिर्रर्खुमा बनविण्याच्या पदार्थाचे वाटप करीत आलेले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम गेली 17 वर्ष झाले अखंडपणे राबवित आले असल्याचे आलताफ सय्यद यांनी सांगितले आहे. रमजान महिन्यात विशेषत: ईदच्या दिवशी न चुकता मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार कधीही विसरत नाही. मुस्लिम समाजाचे प्रश्र्न सोडविण्यासाठी ते सतत तत्पर असतात असेही सय्यद यांनी सांगितले.
काहींच्या मते समाजातील गोर-गरीब, दु:खी पिडीतांना हे पदार्थ जाहीर पद्धतीने देणे चुकीचे आहे. समाजाचे घेऊन समाजाला देणे तेही जाहीर दिल्यास गैर काय आहे. जर हे चुकीचे असते तर गेली 17 वर्षाची परंपरा दुसर्या तिसर्या दिवशीच खंडित झाली असती. मात्र, सध्याचे 18 वे वर्षे आहे अखंडितपणे हा उपक्रम आलताफ सय्यद व एकता ग्रुपच्या वतीने राबविला जातो ही विशेष बाब आहे. अन्यथा काही मंडळी निवडणूका किंवा इतर स्वार्थ पाहुन उपक्रम जास्तीत जास्त एक दोन वर्ष राबवितात.
आलताफ सय्यद यांनी 250 छोट्या व्यवसाय धारकांना प्रत्येकी 3 लाख रूपयांचे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती कर्ज योजना राबविली यामध्ये पहिल्या 100 व्यवसाय धारकांना रक्कम खात्यात आली. उर्वरीत 150 व्यवसाय धारकांना मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते कर्ज मंजूरी पत्राचे वाटप सुद्धा केले होते. ईदच्या पूर्वसंधेला त्यांच्या खात्यात पैसे यावेत अशी आशा सय्यद यांनी व्यक्त केली आहे मात्र, आचारसंहिता असल्याने थोडा अडथळा निर्माण होत आहे. तरी त्यातून सुद्धा मार्ग निघेल असेही सय्यद यांनी सांगितले आहे.
आलताफ सय्यद सारखे समाजात खुप मान्यवर व पदाधिकारी आहेत मात्र, समाजाचं आपण काही तरी देणं लागतो हा विचार ते विसरून गेलेले आहेत. आलताफ सय्यद यांना बोट दाखविणे किंवा नावे ठेवण्यापेक्षा ते करीत असलेल्या कामापेक्षा आणखी जास्त काम कसे करता येईल याची स्पर्धा केल्यास समाजाची वृद्धी होईल.
अन्यथा समाजाचे लचके तोडण्यासाठी काही मंडळी धार लावून बसलेले आहेतच ते समाजासाठी विघातक ठरत आहेत. हेवे दावे बाजूला ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी काय करता येईल याचा विचार आलताफ सय्यद यांच्या दृष्टीकोनातून कॉपी करता आला तर समाजाचं बरे होईल.
सदरचा उपक्रम गेली 17 वर्ष अखंडीत सुरू आहे. यंदाचे 18 वर्ष आहे. सदर पदार्थांच्या नोंदणीसाठी आलताफ सय्यद (मो.9665526001), परवेज सय्यद (मो.9422327786), असिफ झारी (मो.9860237786), सुभान कुरेशी (मो.9881236821) व सलीम तांबोळी (मो.9881020020) यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.