बारामती: निवडणूक म्हणजे विजय पराभव ठरलेला असतो मात्र, पराभव होऊनही त्या मतदार संघात तन-मन व धनाने सामाजिक कार्याचा डोंगर उभा करूनही आज मितीस धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागणार असल्याने केलेल्या कामावर पाणी फेरले गेले असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पार्थ पवार आणि मावळ हे एक सामाजिक दृष्टीकोनातून वेगळे समीकरण होऊन बसले होते. पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघात म्हणजे पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड व पिंपरी याठिकाणी खुप मोठे सामाजिक कार्य केले आहे व करीत आहेत. या केलेल्या कामाची कुठेही प्रसिद्धी केली नव्हती. या कामातून युवकांचे अतुट असे जाळे निर्माण झाले होते.
सन 2019 साली मावळ लोकसभेत विजयी उमेदवाराच्या 36.87 टक्के मते पार्थ पवार यांना मिळाली होती. फक्त 9.03 टक्केच जास्तीची मते विजयी उमेदवाराला मिळाली होती. तसं पाहिला गेले तर अवघड गड तोही पहिल्यांदाच पार्थ पवार यांनी मोठ्या धैर्याने खंबीरपणे लढविला हे मान्यच करावे लागेल.
कोरोनाच्या काळात पार्थ फौंडेशनच्या वतीने खुप मोठे काम करण्यात आले होते. मुंबईजवळील घारापुरी बेटावरील कुटुंबांना घरगुती स्वयंपाकात वापरल्या जाणार्या तेलाचे (प्रत्येकी 5 लीटर) वाटप करण्यात आले. पावसाळ्यात पर्यटन बंद असते. पूर्णतः उत्पन्न पर्यटनावर अवलंबून असणार्या कुटुंबांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा होता. अशा नाजूक परिस्थितीत फाऊंडेशने मदतीचा हात दिला. मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, अतिवृष्टी झालेल्या भागात अन्न-धान्य पुरवठा करणे, रेशनिंग किट, छत्र्या वाटप, रक्तदान शिबीर, क वर्गातील कर्मचार्यांना मोफत कोव्हिड लस इ. अनेक उपक्रम राबवून येथील नागरीकांच्या मनात घर निर्माण केले आहे.
पिंपरी-चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या पिंपरी-चिंचवडचा समावेश मावळमध्ये होतो. या मतदार संघाच्या निर्मितीपासुन मावळ मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडे राहिला आहे. 2014 साली राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपकडे गेले. 2017 साली कमळ फुलवले. मात्र,2019 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भरारी घेतली. या मतदार संघात तेव्हापासुन राष्ट्रवादी कॉंग्रेसची चांगली पकड आहे. मात्र, महायुतीमुळे सदरची जागा पक्षाची चांगली ताकद असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना द्यावी लागली.
पार्थ पवार यांचे सामाजिक भवितव्य उज्ज्वल असले तर राजकीय भवितव्य संकटात असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर करा ते नक्की निवडून येतील असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला होता. सध्या महायुतीचा धर्म फक्त ना.अजित पवारच पाळताचा दिसत आहेत. गेली 9 वर्षात श्रीरंग बारणे यांनी काय काम केले असे येथील स्थानिक मतदार बोलताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणूकीत श्रीरंग बारणे यांना खुप मोठा संघर्ष करावा लागणार आहे.