आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत भाग्याचा दिवस – सौ.सुनेत्रा पवार

बारामती: आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रीया बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रीया व्यक्त केली.

त्या पुढे म्हणाल्या की, महायुतीच्या माध्यमातून मला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रासपचे महादेव जानकर या सर्वांचे अभार मानले असेही त्या म्हणाल्या.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून अखेर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारया रिंगणात असणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदार संघात नणंद विरूद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे.

सुप्रिया सुळेंबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे ही जनतेची लढत आहे. विजय शिवतारे यांच्या तटस्थ भूमिकेमुळे महायुतीत बंडाळी निर्माण झाली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी समजूत व मनधरणी करण्यासाठी यश आले. शिवतारेंनी निवडणूकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करताच काही तासानेच सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!