बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो असा अनमोल विचार बहुजनांमध्ये रूजविणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान, कष्टकर्यांचा सन्मान करून जयंती साजरी करण्यात आली. देसाई इस्टेट येथे गेली 5 वर्षापासुन विशाल जाधव व मित्र परिवारांनी परंपरा कायम टिकवली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल जाधव व मित्र परिवार छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करीत आलेले आहे. दरवर्षी स्नेह भोजन असते. स्नेहभोजनाबरोबर देसाई इस्टेट व आसपासच्या परिसरातील कष्टकरी यामध्ये गॅस सप्लाय करणारे कामगार, नगरपरिषद घंटागाडी कामगार, सफाई महिला कर्मचारी, वीज वितरण कंपनीत जीवाची बाजी लावून वीजेशी दररोज झगडणारे कामगार व विशेषत: सुंदर व स्वच्छ हरित बारामती ठेवणारे उद्यान विभागातील कर्मचारी असे नागरीकांना सेवा देणार्या कष्टकर्यांचा सन्मान यावेळी चषक, शाल व श्रीफळ देवून करण्यात आला.
चौकात भला मोठा स्टेज टाकून, रस्ता आडवून किंवा डीजे लावून गर्दी करून त्याचा ना आयोजकांना फायदा न गर्दी करणार्यांना फायदा होताना दिसत नाही. उलट वाहतुक कोंडी, ध्वनी प्रदुषण व अनाठायी खर्च होत असतो. हे सर्व टाळून देसाई इस्टेट येथे अन्नदान व समाजातील खरे हिरो असणार्या कष्टकर्यांचा यथोचित सत्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित असा दरवर्षी कार्यक्रम राबविला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उच्च विचार असणारे पोवाडे लावून कार्यक्रम केला जातो.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये प्रविण बोरा, सचिन मोरे, नवनाथ भोसले, दत्तात्रय जाधव, मंगेश गिरमे , विकी आगवने, शंकर घोडे, मंगेश खांडेकर, नितीन मोरे, कासिम शेख, मिथुन गायकवाड, स्वप्नील गायकवाड, विजय मोहिते, सागर मोहीते, कुंदन आवळे, स्वप्नील दिवटे, ओंकार लाळगे, अक्षद शहाणे, नवनाथ कुचेकर, अक्षय जाधव, अमरजीत मिसाळ, रमेश, अली पठाण, राज मोरे, निशांत शेंडगे, दिवेकर पाटील, मुबारक तांबोळी, अवि कांबळे, आदित्य लाळगे, साहील माने, कल्याण गावडे, धनसिंग घाडगे, देवेश बोरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.